एक्स्प्लोर

बेंच जुना, निधी नवा, जुन्या आमदाराचं नाव पुसून नव्या आमदाराचं नाव, नागपुरात खुर्चीवरुन वाद

Nagpur News Update : बोगस बिले काढण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर नागपूर महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी एकाच रात्रीत आपला निर्णय बदलला. अधिकाऱ्यांच्या या कारभारामुळे नागपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Nagpur News Update : राजकारणात दोन नेत्यांमध्ये खुर्चीसाठीचा संघर्ष नवीन नाही. मात्र, नागपुरात दोन नेत्यांमध्ये खुर्चीचा एक वेगळाच वाद रंगला आहे. या वादामध्ये दोन्ही आमदारांचे राजकीय डावपेच नाही, तर महापालिकेतील भ्रष्ट कारभार कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. भाजप (BJP) आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेस (Congress) आमदार अभिजित वंजारी यांच्यात हा वाद रंगला आहे.  

दोन्ही आमदारांमधील खुर्च्यांचा हा वाद एवढ्या शिगेला पोहोचला आहे की आता महानगरपालिकेला एकाच दिवसात खुर्च्यांवर लिहिलेले एका नेत्याचे नाव पुसून पुन्हा दुसऱ्या नेत्याचे नाव लिहिण्याची वेळ आली आहे. 

काय आहे वाद?  

नागपूर शहराच्या पूर्व टोकावर वसलेल्या शांतीनगर, प्रेमनगर आणि इतर अनेक वस्त्यांमधील बेंचेसवर काल, परवापर्यंत आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव लिहिले होते. कारण हे बेंचेस खोपडे यांच्या विकास निधीतून देण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार त्या बेंचेसवरील कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून त्यावर आमदार अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यात आले आहे.  

कृष्णा पराते या पेंटरने दिलेल्या माहितीनुसार, "त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शांतीनगर आणि प्रेमनगर भागातील जुन्या बेंचेसवर स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून 2022 च्या योजनेप्रमाणे विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यास सांगितले होते. त्यानुसार कालपासून त्यांनी कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून त्यावर अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यास सुरुवात केली.  

जुन्या बेंचेसवर नवे रंग लावून तेच जुने बेंच 2022 - 23 या वर्षाच्या नव्या योजनेत दाखवून दुसऱ्या आमदारांच्या नावावर नागरिकांच्या माथी मारण्याचा हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचार असल्याचे काही दक्ष नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर नागरिकांनी ही माहिती आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.  

पहिले नाव पुसून दुसरे नाव टाकण्याचा हा प्रकार भ्रष्टाचाराचा असून आमदार अभिजित वंजारी यांच्या विकास निधीतून खर्च दाखवून त्यासाठी जुनेच बेंच वापरून बोगस बिले काढण्याचे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे प्रयत्न असल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला आहे. याबरोबरच महापालिकेने दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी देखील खोपडे यांनी केली आहे. 

पुन्हा कृष्णा खोपडे यांचे नाव
बोगस बिले काढण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी एकाच रात्रीत आपला निर्णय बदलला आहे. ज्या बेंचेसवर आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून आमदार अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यात आले होते त्या बेंचेसवर आज सकाळपासून पुन्हा वंजारी यांचे नाव पुसून कृष्णा खोपडे यांचे नाव लिहिण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हे जुनेच बेंच वापरून आमदारांच्या विकास निधीतून खर्च दाखवून बोगस बिले काढण्याचा प्रकार आहे का? असा संशय निर्माण झाला आहे. 

एबीपी माझाने या प्रकरणी आमदार अभिजित वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता, "आपल्या विकास निधीतून नागरिकांना नवे बेंचेस महापालिकेने दिले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी फक्त नागरिकांनाच फसवत नाहीत, तर ते आमदारांना देखील फसवत असल्याचे समोर आले आहे. 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहा. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget