औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा, मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदी, एकबोटेंनी दिलं स्पष्टीकरण
औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे ( Milind Ekbote) यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.
Milind Ekbote : औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे ( Milind Ekbote) यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे अप्पर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी याबाबत जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत. मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना 16 मार्च 2025 ते 5 एप्रिल 2025 पर्यंत संभाजीनगरमध्ये जिल्हाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मिलिंद एकबोटे औरंगजेबची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हलवली नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करु, असा इशारा दिला आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले मिलिंद एकबोटे?
छत्रपती संभाजीनगरला जाण्याचं माझं कोणतही प्रयोजन नाही, असे असतानाही मला जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस दिल्यामुळं माझी करमणूक झाली असल्याचे एकबोटे म्हणाले. माझं सर्व लक्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यततिथीच्या कार्यक्रमाच्या नियोजनावर आहे. हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे एकबोटे म्हणाले. मला दिलेली नोटीस संपूर्णपणे खोटी आहे. माझा उल्लेख माजी आमदार म्हणून करण्यात आला आहे. मी कोणताही माजी आमदार नाही. कदाचीत भावी आमदार असेन असे एकबोटे म्हणाले. काल्पनिक गोष्टी डोक्यात ठेऊन पोलिस अधिकाऱ्याने ही गोष्ट केलेली आहे.
विधानसभेत गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. अबू आझमींच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झालाय. औसंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असे म्हणत या दोन्ही संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभर एकाच दिवशी औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन होणार असून सकरकारने कबरीबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र आम्ळी बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू अशा इशारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे. शिवजयंती म्हणजेच 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवा या मागणीसाठी आंदोलन करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यादिवशी निवेदन देखील देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष, हिंदू परीषदेसह बजरंग दलानं स्टंट करु नये : हर्षवर्धन सपकाळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
