Weekly Horoscope 17 To 23 March 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी मार्च महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 17 To 23 March 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 17 To 23 March 2025 : मार्च महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशसाठी पुढचा आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. यासाठी तुम्ही कोणताही निर्णय घ्याल तो जपून घ्यावा लागेल. तसेच, तुमच्या व्यवसायिक दृष्टीकोनाचा विस्तार वाढलेला दिसेल. त्यामुळे शत्रूंची तुमच्यावर नजर असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला असलेला तुमचा उत्साह हळुहळू कमी कमी होताना दिसेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. या काळात तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. हाती घेतलेल्या कार्यात कोणतंही विघ्न येणार नाही. तसेच, तुमचा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवल्यामुळे तुमचं मन अस्थिर असेल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर पूरेपूर लक्ष द्यावं लागेल. तसेच, पैशांचा जपून वापर करावा लागेल. काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात घ्याल. मात्र, अशा वेळी घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाग घेणं महत्त्वाचं ठरेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या अनेक राहिलेल्या इच्छा पूर्ण करु शकता. तसेच, तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. या आठवड्यात तुम्ही नवीन वस्तूंची देखील खरेदी करु शकता. मात्र, पैशांचा वापर करताना जपून करा.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी नवीन आठवडा फलदायी असणार आहे. या काळात तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला धनलाभ होईल. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. या आठवड्यात जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. वातावरणातील बदलाचा त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















