Kiran Mane Post : शिवरायांचा तोफखाना प्रमुख सिद्धी इब्राहिम खान; महाराष्ट्र शासनाची जुन्नरमधील पाटी किरण मानेंकडून शेअर
Kiran Mane Post : शिवरायांचा तोफखाना प्रमुख सिद्धी इब्राहिम खान; महाराष्ट्र शासनाची जुन्नरमधील पाटी किरण मानेंकडून शेअर

Kiran Mane Post : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. " छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईत कोणताही मुस्लिम नव्हता. शिवाय त्यावेळीची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची लढाई इस्लाम विरोधात होती. महाराजांच्या सैन्यात कोणतेही मुसलमान नव्हते, उगाच टेप रेकॉर्डर चावलतात", असं वक्तव्य राज्याचे मत्स व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं. दरम्यान, त्यांच्या वक्तव्याशी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले आणि भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी असहमती दर्शवली होती. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते किरण माने यांनी महाराष्ट्र सरकारची एक पाटी शेअर केली आहे.
View this post on Instagram
किरण मानेंकडून महाराष्ट्र शासनाची पाटी शेअर
याशिाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असलेल्या मुस्लिम सैनिकांची नावचं वाचून दाखवली होती. दरम्यान, यामध्ये आता ठाकरे गटाचे नेते आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते किरण मानो यांनी देखील उडी घेतलीये. किरण मानेंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील महाराष्ट्र शासनाची आणि वनविभागाची एक पाटी शेअर केली आहे. यामध्ये लिहिलंय की, "सिद्धी इब्राहिम खान हा शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड होता. जेव्हा महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाची भेट घेतली. त्यावेळी शिवाजी महाराजांसोबत तीन बॉडीगार्ड होते. त्यापैकी एक सिद्धी इब्राहिम खान होता"
हो फोटो शेअर करत किरण माने म्हणाले, जुन्नर मधल्या वन विभागाचं हे उद्यान ! रानडुकरांच्या हैदोसांपासून वाचलेली विविध रंग, रूप, गंध, चव आणि जातीधर्माच्या फळाफुलांनी बहरलेली ही बाग बघायला नक्की जा. ❤️
नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया
दरम्यान,यावर नितेश राणेंच्या वक्तव्यावर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील भाष्य केलंय. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते असा प्रश्न विचारला जातोय. मात्र याबाबत ठोस अशी माहिती नसली तरी इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती मांडली आहे. त्यामुळे याच्यावर चर्चा करणं किंवा वाद घालणं योग्य नाही", असं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितला आहे.
नितेश राणेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया
उदयराजे भोसले म्हणाले, मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकले नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. त्यांनी हिंदू-मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
