एक्स्प्लोर

Aditi Pohankar on Sexual Harassment: 'दादरला फर्स्ट क्लासमध्ये त्यानं माझ्या छातीला...'; मराठमोळ्या अभिनेत्रीनं तात्काळ घेतलेली पोलिसांत धाव, पण

Aditi Pohankar on Sexual Harassment: मराठी सिनेसृष्टीसह ओटीटी गाजवणारी मराठमोळ्या अभिनेत्री अदिती पोहनकरनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला.

Aditi Pohankar on Sexual Harassment: आज आपल्या आसपास, आपण राहतो त्या शहरात किंवा आपल्या देशात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न जर तुम्हाला कुणी विचारला, तर तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का? महिला अत्याचाराच्या घटना सातत्यानं कानावर येत असतात. फक्त सर्वसामान्य महिलाच नाहीतर, अनेक सेलिब्रिटी महिलांनाही या दुर्दैवी घटनांचा, अनुभवांचा सामना करावा लागतो. सेलिब्रिटींबाबत बोलायचं तर कास्टिंग काऊच, अनेक बड्या आणि सध्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट होणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीतही सहभागी असणाऱ्या अभिनेत्रींना धक्कादायक अनुभवांचा सामना करावा लागला आहे. 

नुकताच बॉलिवूडसोबत (Bollywood) हॉलिवूड (Hollywood) गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिनं तिच्यासोबतचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला होता. अशातच आणखी एका मराठी सिनेसृष्टीसह ओटीटी गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपल्यासोबतचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. 

रितेश देशमुखचा गाजलेला मराठमोळा सिनेमा 'लय भारी'मधून (Lay Bhari) घराघरांत पोहोचलेली आणि त्यानंतर ओटीटीवरच्या 'आश्रम' (Aashram), 'she' या वेब सीरिजमधून (Web Series) लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदिती पोहनकरने (Aditi Pohankar) नुकताच तिला आलेला भयानक अनुभव शेअर केला. अदितीसोबत घडलेल्या घटना ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Aaditi S Pohankar (@aaditipohankar)

काय घडलेलं नेमकं? 

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीनुसार, "दादक स्थानकाहून एकदा लोकलमधून प्रवास करताना मी फर्स्टक्लास डब्ब्यात चढले. महिलांच्या फर्स्ट क्लासमध्ये छोट्या शाळकरी मुलांनी आलेलं चालतं. तर काही लहान मुलंही डब्यात चढली. तेव्हा मी साधारणतः अकरावीत शिकत होते. माझ्यासमोर डब्यात एक मुलगा उभा होता. दादरवरुन जशी ट्रेन निघाली, त्यानं माझ्या छातीला हात लावला... ही घटना भर दिवसा सकाळी अकरा वाजता माझ्यासोबत घडली." 

"माझ्यासोबत जेव्हा हे सगळं घडत होतं, त्यावेळी मी कुर्ता घातला होता. त्यामुळे मी काही अशातशा कपड्यांत नव्हतेच. समोरच्या मुलाचा असा काही हेतू असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला धक्काच बसला. मी पुढच्याच स्टेशनला उतरले आणि पोलीस स्थानकात गेले. पण, त्यावेळी पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया शॉकिंग होती.", असं अदिती पोहनकर म्हणाली. 

"काही झालं नाही ना तुम्हाला, आता कुठे त्याला शोधणार?", असं म्हणत पोलिसांनी मला उडवून लावलं, असं अदितीनं सांगितलं. तेवढ्यात पोलीस स्टेशनजवळच तो मुलगा मला पुन्हा दिसला. मी ज्यावेळी त्याला पाहिलं, त्यावेळी तो दुसऱ्या मुलीसोबतही तसंच काहीसं करण्याच्या तयारीत होता. मी त्याला ओळखलं... मी पोलिसांना जाऊन सांगितलं, हाच तो मुलगा... पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नानं पुन्हा एकदा मला धक्का बसला. पोलिसांनी माझ्याकडे पुरावा मागितला. मी विचारलं, पुरावा कशाला हवा? त्यानं माझ्यासोबत ते कृत्य केलंय म्हटल्यावर मला माहीत असणारच ना..." 

मी वैतागल्यावर एक महिला पोलीस कॉन्स्टेबल माझ्यासोबत आली. तिनं त्या मुलाला जाब विचारला. तर त्या मुलानं आपण असं काहीच केलेलं नाही, असं सांगत स्पष्ट नकार दिला. त्यावेळी तिथेच माझ्यात दुर्गा संचारल्यासारखं झालं. मी त्याच्यावर जोरात ओरडले. माझ्या आवाज ऐकून तो घाबरला आणि लगेच 'हो हो, मी केलं' असं म्हणाला. मी त्याची कॉलर पकडली आणि 'परत कोणासोबत करशील?' असं विचारलं. त्याला पोलिसांकडे दिलं. मी त्याच्यावर ओरडले नसते तर त्याने मान्यच केलं नसतं."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Famous Actor Struggle With Blood Cancer: दिग्गज अभिनेता देतोय ब्लड कॅन्सरशी झुजं; आजारपणाबाबत खुलासा करताच इंडस्ट्री हादरली, 'या' दोन प्रसिद्ध अभिनेत्यांकडे व्यक्त केली शेवटी इच्छा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaSanjay Raut On Eknath Shinde Congress | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, राऊतांचा दावाSanjay Raut PC | महाराष्ट्र सरकार ढोंगी, दुतोंडी; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Embed widget