Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates: गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून दोन रुपयांनी वाढ झालीआहे. गायीचं दूध प्रतिलिटर 58 रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रुपयांवर पोहचलं आहे. तर संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या नावाने पैशांची वसुली केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता आहे. एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना सुरेश धस यांनी कबुली देखील दिली आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
होल्ला मोहल्ला निमित्त हल्लाबोल मिरवणूक, हजारो शीख भाविक सामील
Nanded - नांदेड मधील सचखंड गुरुद्वारा मध्ये होळी अर्थात होल्ला मोहल्ला सण उत्साहात साजरा करण्यात आला. सचखंड गुरुद्वारा येथे पाच दिवस होळीचा हा सण साजरा केला जातो. गेले सव्वा तीनशे वर्षापासून ही परंपरा पाळली जाते. देश विदेशातून हजारो भाविक होळी निमित्त नांदेड मध्ये दाखल होत असतात. यंदाही हजारो भाविक या सणानिमित्त नांदेड मध्ये दाखल झाले आहेत. होल्ला मोहल्लाची सांगता प्रतिकात्मक हल्लाबोल काढून करण्यात येते. हल्लाबोल मध्ये शीख भाविक हातात शस्त्र घेऊन प्रतिकात्मक हल्ला करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराच नाव उद्या जाहीर होण्याची शक्यता
ब्रेकींग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराच नाव उद्या जाहीर होण्याची शक्यता
उद्या दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीला बैठक
कोअर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर उद्या चर्चा होऊन बैठकी नंतर उमेदवाराच नाव जाहीर करण्यात येणार
सध्या पक्षाकडून विधान परिषदेसाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना सूचना






















