IPL 2025 Mumbai Indians: हार्दिक पांड्यावर बॅन, CSK विरुद्ध कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार?
IPL 2025 Hardik Pandya Mumbai Indians: पहिल्या सामना गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल.

IPL 2025 Hardik Pandya Mumbai Indians: आयपीएल 2025 चा शुभारंभ 8 दिवसांनी म्हणजेच 22 मार्चपासून होणार आहे, तर अंतिम सामना 25 मे 2025 रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या सामना गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. यानंतर 23 मार्च रोजी दोन सामने खेळवण्यात येतील. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना रंगणार आहे. मात्र याआधी मुंबई इंडियन्सबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या 2025 च्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) खेळता येणार नाही. त्यामुळे एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचं कर्णधार सुर्यकुमार यादव सांभाळताना दिसताना दिसेल.
हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी-
आयपीएल 2024 च्या मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर हार्दिक पांड्यावर वर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. एमआय संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नसल्याने आयपीएल 2025 च्या हंगामापर्यंत बंदी कायम राहील. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या चेन्नईविरुद्ध संघाचा पहिला सामना खेळू शकणार नाही. हार्दिकला आयपीएल 2024 मध्ये तीन ओव्हर-रेट गुन्ह्यांसाठी दंड ठोठावण्यात आला होता. लीगच्या नियमांनुसार, जेव्हा एखादा संघ एका हंगामात तीन वेळा आवश्यक ओव्हर-रेट राखण्यात अपयशी ठरतो, तेव्हा कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ-
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मीन्झ, रायन रिकिलटन, कृष्णन श्रीजित, बेवोन जेकॉब्स, हार्दिक पांड्या, दीपक चहर, राज बावा, विल जॅक्स, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, अश्वानी कुमार, अल्लाह गुझनफर, रीस टोपली, सत्यनारायण राजू, अर्जून तेंडुलकर, लिझार्ड विलियम्स
#MumbaiIndians live up to their slogan 'Duniya Hila Denge Hum', with this powerhouse squad! 🥶
— Star Sports (@StarSportsIndia) November 25, 2024
Ready, Set, Go, #MIFans 💙 for #TATAIPL2025!#TATAIPLAuction #IPLAuctionOnJioStar pic.twitter.com/jacg9BYVZC
पाच महागडे खेळाडू कोणते ठरले?
लिलावातील पहिल्या पाच सर्वात महागड्या खेळाडूंवर नजर टाकल्यास ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने त्याला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. व्यंकटेश अय्यर हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांनाही पंजाब किंग्सने विकत घेतले. यावेळी अर्शदीप आणि युझवेंद्र चहलला संघात घेण्यासाठी पंजाब किंग्सने 18 कोटी रुपये मोजले.





















