David Warner First Look: मैदान गाजवल्यानंतर डेव्हिड वॉर्नर सिल्वर स्क्रिन गाजवणार; साऊथ फिल्म डेब्यूसाठी सज्ज, FIRST LOOK रिलीज
David Warner First Look: डेव्हिड वॉर्नर लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तो एका तेलुगू चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगात प्रवेश करणार आहे. चित्रपटातील त्याचा पहिला लूकही समोर आला असून पोस्टरमध्ये त्याचा लूक खूपच अद्भुत दिसतोय.

David Warner First Look: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू (Former Australian Cricketer) त्यांच्या आगळ्या वेगळ्या अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि त्याचं भारताबाबत असलेलं प्रेम काही लपलेलं नाही. वॉर्नरच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर तो नेहमी भारतीय गाण्यांवरचे रिल्स शेअर करत असतो. कधी एकटा डेव्हिड वॉर्नर दिसतो, तर कधी अख्खं वॉर्नर कुटुंब भारतीय गाण्यांवर थिरकताना रिल्समध्ये पाहायला मिळतं.आपल्या रिल्सद्वारे तो नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करत असतो, तसेच, त्यानं रिल्समुळे अनेक भारतीय चाहत्यांना आपलंस करुन घेतलं आहे. अशातच आता डेव्हिड वॉर्नर लवकरच भारतीय फिल्म इंडस्ट्रीत आपला डेब्यू करणार असल्याची माहिती मिळत आहे.
डेव्हिड वॉर्नर आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. साऊथ सिनेमातून डेव्हिड वॉर्नर आपला फिल्म डेब्यू करणार आहे. यापूर्वीच वॉर्नरच्या चित्रपटाबाबत माहिती समोर आली होती. अशातच आता डेव्हिड वॉर्नरचा धडाकेबाज लूक समोर आला आहे. डेव्हिड वॉर्नरचा फर्स्ट लूक रिलीज होताच, चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या डेब्यू फिल्मचं नाव काय?
डेव्हिड वॉर्नर तेलुगू भाषेतील 'रॉबिन हूड' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. याआधी त्यानं कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. 15 मार्च रोजी निर्मात्यांनी या चित्रपटातील त्याचा पहिला लूक शेअर केला. त्याचं एक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. पोस्टरमध्ये डेव्हिडची स्टाईल खूपच छान दिसतेय. पोस्टरमध्ये मूळचा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर असलेला डेव्हिड वॉर्नरवर दाक्षिणात्य सिनेमाचा रंग चढल्याचं पाहायला मिळत आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या पोस्टवर फिल्मचं नाव लिहिलेलं आहे. याव्यतिरिक्त त्याचं स्वागत करताना पोस्टरवर लिहिलं आहे की, "बाऊंड्रीपासून बॉक्स ऑफिसपर्यंत, इंडियन सिनेमामध्ये डेव्हिड वॉर्नरचं स्वागत आहे..." तसेच, पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं आहे की, "चमकल्यानंतर आणि ग्राऊंडवर आपली छाप सोडल्यानंतर आता वेळ आहे सिल्वर स्क्रिन गाजवण्याची..."
View this post on Instagram
डेव्हिड वॉर्नरचा कॅमिओ
आगामी चित्रपटात डेव्हिड वॉर्नर फुल फ्लेज्ड रोलमध्ये नाही, तर तो कॅमिओ करणार आहे. ही फिल्म 28 मार्च रोजी वर्ल्डवाईल्ड रिलीज होणार आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचे फॅन्स या फिल्मसाठी एक्सायटेड झाले आहेत. त्याच्या चाहत्यांना चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. अशातच पहिल्या फिल्ममार्फत आता वॉर्नर चाहत्यांवर छाप सोडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, मिथ्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटात तेलुगू अभिनेता नितीन मुख्य भूमिकेत आहे. श्रीलीला देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. वेंकी कुडुमुला यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 2021 मध्ये जेव्हा 'पुष्पा'चा पहिला पार्ट आला, तेव्हा डेव्हिड वॉर्नरवर पुष्पाची जादू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानं अनेक रिल्स 'पुष्पा' स्टाईलनं शेअर केले होते. अशातच आता तो स्वतः दाक्षिणात्य रंगात रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























