एक्स्प्लोर
सहा वर्षाच्या चिमुकलीची निर्दयी पित्याकडून हत्या, बीडमधील घटनेने खळबळ
सहा वर्षाच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपावरून वडवणी पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. पोटच्या पोरीला मारणाऱ्या या निर्दयी बापाच्या कृत्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रातिनिधीक फोटो
बीड : अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा जन्मदात्या निर्दयी बापानेच हत्या केल्याची घटना बीडच्या वडवणी शहरामध्ये घडली आहे. अमृता शिंदे असं या दुर्देवी चिमुरडीचं नाव आहे. अमृताचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपावरून वडवणी पोलीसांनी तिचा पिता गणेश शिंदेला अटक केली आहे. पोटच्या पोरीला मारणाऱ्या या निर्दयी बापाच्या कृत्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देखील गणेश शिंदे यानेच दिली होती.
वडवणी येथील चिंचोटी रस्त्यावर शेतात घर करून राहणाऱ्या गणेश शिंदेची सहा वर्षीय अमृता शिंदे ही मुलगी सोमवारी सकाळी बेपत्ता झाली होती. मंगळवारी दुपारी एका पाण्याने डबडबलेल्या ओढ्यात ती मृतावस्थेत आढळून आली होती. मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी वडवणी पोलीसांनी वडवणी येथील आरोग्य केंद्रात पाठविले होते.
या प्रकरणांमध्ये काहीतरी घातपात असल्याची शंका पोलिसांना आली आणि म्हणून वडवणी पोलिसांनी सदर शवविच्छेदन हे उच्च स्तरीय होणे आवश्यक आहे, असे सांगून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने अमृताचा मृतदेह अंबाजोगाईला शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला होता.
शवविच्छेदन झाल्यानंतर गळा आवळून खून झाल्याचा निर्वाळा डाॅक्टरांनी केला. पोलिसांनी संशयावरुन गणेश शिंदे याच्या रात्रीच मुसक्या आवळल्या. अमृता ही गती मंद होती, अशी माहिती मिळाली आहे. तिची हत्या केल्याची कबुली गणेश शिंदेनं दिल्यानंतर त्याला अटक करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने गणेश शिंदेला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
