एक्स्प्लोर

Gadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

गडचिरोलीत नक्षलवादाचे कंबरडे मोडण्यामध्ये C-60 ची महत्वाची भूमिका आहे.. C-60 कोणत्या आव्हानात्मक परिस्थिती मध्ये काम करते हे ही आपण जाणून घेतले आहे.. मात्र, C-60 च्या काही निवडक शूरांचे आजवर जगासमोर न आलेले शौर्य ही जाणून घेणे महत्वाचे आहे... गेल्या काही वर्षात मोठ्या चकमकींमध्ये C-60 च्या काही निवडक शूरांनी कसा शौर्य गाजवला आहे हे जाणून घेऊ या एबीपी माझाच्या या विशेष रिपोर्ट मधून....  
  
13 nov 2021 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मर्दीनटोला येथे C - 60 च्या शुर जवानांनी 27 नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले होते, सोबतच नक्षलवाद्यांचा सरसेनापती मिलिंद तेलतुंबडेलाही यमसदनी धाडले होते... या चकमकीत C-60 अनेक जवानांनी शौर्य दाखविला होता... मात्र, रवींद्र नैताम आणि टिकाराम काटेंगे या दोघांनी त्या चकमकीत गंभीर जखमी होऊन ही अप्रतिम शौर्य गाजवला होता.. 

कशी होती मर्दिनटोला ची चकमक
# १३ नोव्हेम्बर २०२१ रोजी मर्दीनटोला येथे मोठ्या संख्येने नक्षलवादी आणि त्यांचे काही मोठे कमांडर असल्याची गोपनीय माहिती मिळाली.. 
# C-60चे काही पथक लगेच मर्दीनटोला कडे निघाले..  
# नक्षलवादी डोंगरावर होते आणि तर खालून जावं वर दिशेने जात असताना नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केले.. 
# C-60चे पथक डोंगराच्या खाली पन्नास मीटरच्या समतल भागावर पोहोचले आणि अगदी समोरासमोर जोरदार चकमक सुरु झाली.. 
# या चकमकीत C-60चे जवान आणि नक्षलवादी एवढ्या जवळ होते की एकमेकांचे संभाषण सुद्धा ऐकू शकत होते.. 
# नक्षलवाद्यांची संख्या जास्त असल्याने एक एक जवानावर सहा ते सात नक्षलवादी हल्ला करत होते.. 
# तरी C-60 च्या शूर जवानांनी 27 नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले आणि नक्षलवाद्यांच्या सरसेनापती मिलिंद तेलतुंबडे ला ही यमसदनी धाडले...  
# विशेष म्हणजे याच चकमकीत नक्षलवाद्यांनी पहिल्यांदा पोलिसांच्या विरोधात UBLG सारखे घातक हत्यार वापरले होते...  
# या चकमकीतील शौर्यासाठी रवींद्र नैताम आणि तुकाराम काटेंगे यांना शौर्य चक्र बहाल करण्यात आले... 

अशीच एक जोरदार चकमक होती 17 जुलै 2024 रोजी घडलेली वांडोलीची चकमक... 

कशी होती वांडोली ची चकमक
# या चकमकीत C-60 चे तीन पथक मोठ्या संख्येने असलेल्या नक्षलवाद्यांच्या विरोधात लढत असताना नक्षलवाद्यांनी चक्रव्यूह निर्माण करत दोन पथकांना घेरले होते.. 
# तेव्हा पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांनी शंकर पोटावी, विवेक शेंगोळे अशा सहकाऱ्यांच्या मदतीने नक्षलवाद्यांचे चक्रव्यूह भेदून अडकलेल्या दोन पथकांना सुरक्षित बाहेर काढले होते...  
# या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या खांद्यातून गोळी आरपार गेली होती... 
# तर शंकर पोटावी आणि विवेक शेंगोळे ही गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले होते... 
# तरी हे सर्व जखमी अवस्थेत ही लढत राहिले... आणि आपल्या सहकार्यांना सोडून बाहेर पडले नव्हते.. 
# १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालत मोठ्या संख्येने हत्यार जप्त करण्यात आले होते..
# या चकमकीमुळे उत्तर गडचिरोली मधून चातगाव, कसनसूर आणि टिपागड हे तीन दलम कायमचे संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त झाला होता...

अशीच एक महत्वाची चकमक म्हणजे 21 ऑक्टोबर 2024 रोजी घडलेली कोपरशीची चकमक... यात C-60 च्या पथकाने चक्क दोन दिवस महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांशी लढा दिला होता.... 

कशी होती कोपरशी ची चकमक
# नक्षलवाद्यांचा अनेक तास पाठलाग करत सी सिक्सटी चे जवान भामरागड मधून पायी चालत छत्तीसगड पर्यंत गेले होते..
# महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर अबुझमाडच्या जंगलात तब्बल दोन दिवस थांबून थांबून ही चकमक चालली होती...   
# या चकमकीत C-60 चे जवान कुमोद आत्राम यांच्या पायात तीन गोळ्या लागल्यानंतर ही ते लढले होते..
# आजवर ते पूर्ण बरे झालेले नाही... 

अशाच एका अप्रतिम शौर्याची घटना मेडपल्ली जवळ घडली जेव्हा कर्तव्यासाठी तत्पर महादेव मडावी या C-60 च्या जवानाने जखमी असताना ही हेलिकॉप्टर ने सुरक्षित एरलिफ्ट होण्या ऐवजी आपल्या सहकाऱ्यांसह रणांगणात राहणे पसंत केले होते...    

काय घडले होते महादेव मडावी सोबत 
# मरोडपार जंगलात C-60 चे अभियान सुरू असताना 4 जुलै 2024 रोजी माहिती मिळाली कवंडे गावात नक्षलवादी आहेत... 
# महादेव मडावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 9 किलोमीटर पायी चालून कवंडे गावात जाऊन चार नक्षलवाद्यांना अटक केली होती.. 
# पुन्हा १३ किमी पायी चालून अटकेतील चार ही नक्षलवाद्यांना डोडराज येथे सुखरूप पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केले... 
# त्यानंतर महादेव मडावी यांचे पथक कॅम्प कडे परत येत असताना मेडपल्ली पुलाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरंग स्फोट आणि फायरिंगच्या माध्यमातून हल्ला केला.. 
# त्या ठिकाणी महादेव म्हणावी जखमी झाले.. वरिष्ठांनी त्यांना हेलिकॉप्टरने एयरलिफ्ट करण्याची तयारी दर्शवल्यानंतरही महादेव मडावी यांनी चकमक स्थळी आपल्या पथकाची साथ सोडण्यास नकार दिले 
# नंतर दोन दिवसांनी पथकासोबतच कॅम्प मध्ये परत आले..  

 नक्षलवादाविरोधात लढणारा C-60 चा पथक आज महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वाधिक चपळ, अनुशासित आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ऑपरेशन्स राबविणारा पथक आहे... आणि कोणता ही गाजावाजा न करता या पथकातील शूर जवान आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनात फक्त  नैसर्गिक साधनांनी समृद्ध असलेल्या गडचिरोलीच्या भूमीला नक्षलवादापासून मुक्त करत स्थानिक भूमिपुत्रांसाठी विकासाची नवी पहाट ही आणत आहे... म्हणूनच C-60 पथकाची घोषणा "वीर भोग्या वसुंधरा" त्यांच्या योगदानाला अत्यंत समर्पक आहे...     

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
Embed widget