एक्स्प्लोर

Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा

महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान दिसत असून गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतोय.

Maharashtra weather update: देशभरात उत्तरेकडील राज्यांना तुफान पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली असून दक्षिण भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय. सांगलीत दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने एकाचा बळी गेला. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात 37 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या नोंदी होत आहेत. उन्हाची धग वाढली आहे. पुढील 5 हे दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. आज (26 फेब्रुवारी) मुंबईसह 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा yellow alert देण्यात आला आहे. (IMD) 

हवामान विभागाचा अंदाज काय?

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकीकडे उत्तर पाकिस्तानला जोडून हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवात तयार झाला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर, लडाख हिमाचल प्रदेशसह पंजाब,हरियाणा, राजस्थानपर्यंत तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे दक्षिणेत अंदमान आणि निकोबार बेटांवर चक्राकार वारे वाहत असल्याने तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांनाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतातही पावसाचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसही संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान नोंदवले जात आहे.

महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

दरम्यान महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान दिसत असून गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान होते. बहुतांश ठिकाणी सर्वाधिक कमाल तापमानांची नोंद झाली. मुंबईत पारा 38 अंश सेल्सिअस वर गेला होता. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतोय. प्रादेशिक हवामानात केंद्राच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. हवामान विभागाने आज (26 फेब्रुवारी) पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यल्लो अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवसही संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान नोंदवले जात आहे.

मंगळवारी (25 फेब्रुवारी) मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. कुलाब्यात 34.6°c तर सांताक्रुजला 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंशाने वाढ होणार आहे. कोकण विभागात 37 ते 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होईल. विदर्भात कमाल व किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी येत्या दोन दिवसात तापमान वाढणार आहे.

मंगळवारी राज्यभरात तापमानाच्या नोंदी काय झाल्या?

मध्य महाराष्ट्रात पुणे नाशिक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंशावर स्थिरावले होते. साताऱ्यात 39.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापुरातही पारा 38 अंश सेल्सिअस वर होता. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर 36.4 अंश सेल्सिअस, बीड 35 हिंगोली 36 लातूर 37.6, धाराशिव 34.2 डिग्री सेल्सिअसवर होते. विदर्भात नागपूर 33.2, धुळे 36.4, नंदुरबार 42 वर्धा 35.7 अंश सेल्सिअस वर होते.

हेही वाचा:

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन

व्हिडीओ

Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
Embed widget