LIVE UPDATES | प्राजक्ता गायकवाड वाद, अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे भोलसे यांची भेट
जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत, एबीपी न्यूज सी वोटरचा र्सर्व्हे अर्णब गोस्वामी यांच्या अंतरीम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला दिल्ली- हैदराबाद आज आमने-सामने, विजेता संघ अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार
LIVE

Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
दिवाळीच्या तोंडावर ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! येत्या सोमवारपासून थेट खात्यात पैसे जमा होणार
राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करताना सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु,असं मुख्यमंत्री म्हणाले होते. अखेर आज यासंदर्भात निर्णय झाला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं होतं. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही असं वचन सरकारने दिलं होतं. ते सरकार पूर्ण करत आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल. ही मदत थेट खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना दोन हफ्त्यात मदत मिळणार आहे. पहिला हफ्ता 4700 कोटीचा असणार आहे.
दिवाळी दिव्यांची, फटाक्यांची फटाळी नाही! राज्य सरकारकडून दिवाळीसाठी गाईडलाईन्स जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळी सण साजरा करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जावा, आवाजाचा उत्सव म्हणून नाही, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात फटाकेबंदीवरुन कॅबिनेटमध्ये जोरदार चर्चा झाली.
दिवाळीच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या
- कोरोना संदर्भात असलेल्या SOP चे पालन करावे
- दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
- दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.
- धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही, त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.
महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार का?
राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री मागणी केली. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. आज (5 नोव्हेंबर) टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.
आता WhatsApp वरूनही करता येणार पैसे ट्रान्सफर ; NPCI ने दिली परवानगी
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होते परंतु, व्हॉट्सअॅपनं लाँच केलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणेही शक्य झाले. व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. जून महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपने पेमेंट सर्व्हिस सुरू केली होती. परंतु ही सेवा वापरण्याची संधी केवळ काही व्हॉट्सअॅप यूजर्सला मिळाली होती. आतादेखील NPCI ने काही मोजक्या क्रमांकाना व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु आता कंपनी आगामी काळात ही मर्यादा वाढवणार आहे
NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप पेमेंट सुविधेसाठी गो लाईव्हची मंजुरी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप या मंजुरीच्या प्रतिक्षेत होता, कारण या सुविधेची चाचणी अगोदरच घेण्यात आली होती. त्यामुळे आता लवकरच व्हॉट्सअॅप पेमेंटचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
Qualifier 1: मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सची दाणादाण! 57 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश
आयपीएल 2020 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या या विजयात जसप्रीत बुमराहची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने त्याच्या चार षटकांत केवळ 14 धावा देऊन चार बळी घेतले. दिल्लीकडे अद्याप अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. आता ती एलिमिनेटर सामन्यात विजयी संघासह दुसरा पात्रता सामना खेळेल.
या सामन्यात सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या शानदार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत पाच गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल शून्यावर तीन गडी गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स निर्धारित षटकात आठ गडी गमावून केवळ 143 धावा करू शकला.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीला आला. दुसर्या षटकात सलामीवीर रोहित शर्मा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. रविचंद्रन अश्विनने त्याला रोहितचा बळी ठरविला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
