एक्स्प्लोर
अंबाजोगाई ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसचा तुटवडा!
मागणी करुनही अद्याप लस उपलब्ध होत नसल्याचं स्वत: ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितलं.

बीड : कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तात्काळ द्यावी लागणाऱ्या रेबीज व्हॅक्सिनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात मागील 15 दिवसांपासून ही अत्यावश्यक रेबीजची लस उपलब्ध नाही.
या रुग्णालयात गेलेल्या अजित मुळीक नावाच्या रुग्णाला हा अनुभव आला. त्यांनी सांगितलेल अनुभव असा होता की, “पाळीव कुत्रा चावला म्हणून आज सकाळी साडे अकराच्या सुमारास ते अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयात रेबीजची लस घ्यायला गेले होते. त्यांनी आधी 20 रुपयांची पावती घेतली आणि नंतर 20 नंबर वॉर्डकडे जाण्यास सांगितलं. पण दहा दिवसांपासून रेबीजची लस उपलब्ध नाही. उद्या किंवा परवा परत या लस आली तर याच 20 रुपयांच्या चिठ्ठीवर तुम्हाला लस तुम्हाला देऊ, असं त्यांना सांगण्यात आलं.
अजित मुळीक यांच्यासारखे आणखी 40 ते 50 रुग्ण रांगेत उभे असल्याचं पाहिलं. रुग्णालयाती डॉक्टर बाहेरुन लस आणा, असं सांगत होते. या लसीची किंमत साधारण 350 रुपये आहे आणि कुत्रा चावल्यावर ही लस तीन वेळा घ्यावी लागते. म्हणजे त्यावर सुमारे 1050 रुपये खर्च होतो.”
“तिथे असलेले गरीब रुग्ण लस उद्या किंवा परवा आल्यावर घेऊ असं म्हणत होती. पण रेबीजची लस 24 तासांच्या आत घ्यावी लागते हे त्यांना माहित नसावं. डॉक्टर पण उद्या या असं सांगत आहेत,” असं अजित मुळीत म्हणाले.
“रेबीजसारख्या जीवघेण्या रोगाला इलाज उपलब्ध नाही, फक्त लसीकरणामुळेच त्याचा बचाव होऊ शकतो, अशा गंभीर रोगाची लस का उपलब्ध नाही? तुमच्याकडे जर 15 दिवसांपासून लस उपलब्ध नाही तर तुम्ही 20 रुपये का घेता? रग्णाला चुकीचं मार्गदर्शन करुन उद्या परत यायला का सांगता? जर यामुळे कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल?” असे प्रश्न अजित मुळीक यांनी उपस्थित केले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या स्वतःच्या अधिकारात या लसेची निर्मिती होते. मागणी करुनही अद्याप लस उपलब्ध होत नसल्याचं स्वत: ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
