(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajmata Jijabai Birth Anniversary : सिंदखेडराजा येथे होणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवावर कोरोनाचं सावट, फक्त 50 जणांना परवानगी
बुलढाण्यातल्या सिंदखेडराजा इथं 12 जानेवारीला साजरा होणाऱ्या जिजाऊ (Rajmata Jijabai) जन्मोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. या सोहळ्यासाठी केवळ 50 जणांनाच परवानगी दिली आहे.
Rajmata Jijabai Birth Anniversary : बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे 12 जानेवारी रोजी होणाऱ्या राजमाता जिजाऊ (Rajmata Jijabai) जन्मोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. या सोहळ्यासाठी फक्त 50 जणांना परवानगी दिली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांना कोरोना लशीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आणि आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे.
बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात दरवर्षी 12 जानेवारीला जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने अटी व शर्तीच्या आधीन राहून जन्मोत्सव साजरा करण्यासाठी फक्त 50 जणांनाच परवानगी दिली आहे.
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणीच्या निगेटिव्ह अहवालासह लशीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक केलं आहे. यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही कोरोनामुळे जिजाऊ जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.
सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातून लोक या उत्सवासाठी येत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून देशभरातच कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जन्मोत्सवासाठी फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
देशावर कोरोनाचं संकट
देशात कोरोनाचं संकट गडद होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 90 हजार 928 रुग्णांची नोंद देशात झाली आहे. तर 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Coronavirus Vaccination : बुस्टरसाठी आधी घेतलेल्या लशीचेच डोस; कॉकटेल लशीच्या चर्चांना केंद्राकडून तूर्तास पूर्णविराम
- COVID 19 Cases In Mumbai : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? 7 दिवसांत कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा 1300 वरुन 15 हजारांवर
- Omicron Cases In India: भारतातील 24 राज्यांत 2 हजार 135 ओमायक्रॉनचे रूग्ण, राजस्थानात एकाचा मृत्यू