Coronavirus Vaccination : बुस्टरसाठी आधी घेतलेल्या लशीचेच डोस; कॉकटेल लशीच्या चर्चांना केंद्राकडून तूर्तास पूर्णविराम
भारतात 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे. या आधी घेतलेल्या लशीचाच बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे कोरोना टास्क फोरचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी यांनी सांगितले.
![Coronavirus Vaccination : बुस्टरसाठी आधी घेतलेल्या लशीचेच डोस; कॉकटेल लशीच्या चर्चांना केंद्राकडून तूर्तास पूर्णविराम booster dose center big statement regarding the third dose said booster dose will be the same vaccine which was given earlier Coronavirus Vaccination : बुस्टरसाठी आधी घेतलेल्या लशीचेच डोस; कॉकटेल लशीच्या चर्चांना केंद्राकडून तूर्तास पूर्णविराम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/fadfe73dbc7fbf43a786ecff2c131304_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Vaccination : 10 जानेवारीपासून भारतात कोरोनाचे ( corona) दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस ( Booster shot ) देण्यात येणार आहे. बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. कोरोना टास्क फोरचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी यांनी याबाबत माहिती दिली.
डॉ. वी. के. पॉल यांनी सांगितले की, बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, तीच लस बुस्टर डोस देण्यात येणार आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल.
देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बुस्टर डोस देण्यावर विचार झाला आहे. 30 डिसेंबर 2021 रोजी कोरोनाचा राष्ट्रीय पॉझिटिव्हिटी रेट 1.1 टक्के होता. तो आता 5 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती डॉ. वी. के. पॉल यांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बोलताना डॉ. वी. के. पॉल म्हणाले, भारतात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटमुळे रूग्णसंख्या वाढत आहे. देशातील मोठ्या शहरात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत आहेत.
दरम्यान, आयसीएमआरचे संचालक प्रा. बलराम भार्गव यांनी सांगितले की, ओमायक्रॉन देशात झपाट्याने वाढत असून त्याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सामूहिक कार्यक्रम टाळले पाहिजेत. त्याबरोबरच आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, भारतात गेल्या आठ दिवसांत 6.3 टक्कांनी कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर 29 डिरेंबर रोजी 0.79 टक्के असेलेला पॉझिटिव्हिटी रेट 5 जानेवारीपर्यंत 5.03 टक्के झाला आहे.
या राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव
देशात सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या 653 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यातील 259 जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्राखालोखाल दिल्लीत 464 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. त्यातील 57 जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. त्यानंतर केरळमध्ये 185 तर राजस्थानमध्ये 174 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. याबरोबरच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंड आणि गुरजातमध्ये ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Coronavirus Maharashtra : तूर्तास लॉकडाऊन नाही, क्वारंटाईनचा कालावधी बदलला, राजेश टोपेंच्या महत्त्वाच्या 5 घोषणा
COVID 19 Cases In Mumbai : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? 7 दिवसांत कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा 1300 वरुन 15 हजारांवर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)