Omicron Cases In India: भारतातील 24 राज्यांत 2 हजार 135 ओमायक्रॉनचे रूग्ण, राजस्थानात एकाचा मृत्यू
देशात सर्वात जास्त ओमायक्रॉनचे (Omicron) रूग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या 653 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
Omicron Cases In India: भारतात कोरोनाचा (Corona) नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Omicron) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशातील 24 राज्यांमध्ये 2 हजार 135 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत. यातील 828 रूग्ण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनमुळे होणारा हा देशातील पहिला मृत्यू आहे. राजस्थानमधील जयपूर येथील एका 72 वर्षाच्या व्यक्तिचा ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबची माहिती दिली आहे.
जयपूरमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला मधूमेहासह आणखी काही आजार होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अहवाल येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले, ओमायक्रॉन संसर्गाचा अहवाल येण्याआधी या व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी त्याचा मृत्यू हा ओमायक्रॉनमुळेच झाला आहे. कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर नियमानुसार उपचार सुरू होते. कोरोना उपचारांबरोबरच त्याच्या इतर आजारांवरही उपचार सुरू होते. ओमायक्रॉनचा अहवाल येण्याआधी या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. नियमावलीनुसार त्या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याचे मानले जाते. त्यानंतर त्याचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू हा ओमायक्रॉनमुळे झाल्याचे मानले जाते.
देशात सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रूग्ण महाराष्ट्रात
देशात सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या 653 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यातील 259 जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्राखालोखाल दिल्लीत 464 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. त्यातील 57 जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. त्यानंतर केरळमध्ये 185 तर राजस्थानमध्ये 174 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Omicron cases : मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित, BMC आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांची माहिती
- Exclusive : कोरोनाची तिसरी लाट येणार नाही कारण... पाहा काय म्हणतायेत डॉ. रवी गोडसे
- Corona Vaccine : Covaxin लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल, पेन किलर घेऊ नका; भारत बायोटेकचा सल्ला, कारण काय?