Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांपासून माणसांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे, विशेषतः पोल्ट्री फार्म किंवा पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी अधिक सावध राहावे.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गावात बर्ड फ्लूची एन्ट्री झाली आहे.(Bird Flu) गावातील पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी कावळ्यांचा मृत्यू झाला होता. याचा अहवाल समोर आला असून बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा उघड झाले आहे. यानंतर पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत अलर्ट मोडवर आले असून कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरात विविध उपायोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचा परिसर, सुभाष देशमुख यांचे घर प्रतिबंधित करण्यात आले आहे. तर ढोकी शहराच्या 10 किमी त्रिजेचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय. या परिसरातील कुक्कुटपालन केंद्रावरील पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. तसेच परिसरातील मटन,मास विक्री देखील बंद राहणार आहे. (Dharashiv)
कोरोनानंतर भारातात आलेल्या बर्ड फ्लूने केरळ राजस्थान मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात हाहाकार दिसून आला. त्याच दरम्यान, अनेक ठिकाणी स्थलांतर करून येणाऱ्या कावळ्यासह इतर पक्षांच्या मृत्यूंमध्ये झालेल्या वाढीने चिंतेचे वातावरण पसरले होते. आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढले असून धाराशिव जिल्ह्यात बर्ल्ड फ्लूची एन्ट्री झाल्याने पशुसंवंर्धन विभागासाह ग्रामपंचायतही अलर्ट मोडवर आली आहे. ढोकी गावात कोंबड्यांऐवजी कावळ्यांचा पटापट मृत्यू झाल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत असून परिसरात उपाययोजनांना सुरुवात झाली आहे.
बर्ड फ्लू म्हणजे काय? कितपत धोकादायक?
बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणूनही ओळखले जाते. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो केवळ पक्ष्यांनाच संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. यातील बहुतेक विषाणू पक्ष्यांपर्यंतच मर्यादित असले तरी पक्ष्य्यांसाठी हा रोग प्राणघातक आहे. या रोगाचे विविध प्रकार आहेत.H5N1 मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता आहे. H5N1 ची लागण झालेले पक्षी 10 दिवसांपर्यंत विष्ठा आणि लाळेत विषाणूच्या रूपात सोडत राहतात. दूषित क्षेत्राच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. दरम्यान, सतत स्थलांतर करणाऱ्या पक्षांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याने याचा धोकाही अधिक आहे.
माणसांना प्रादुर्भाव होतो का?
बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांपासून माणसांपर्यंत पोहोचू शकतो. जगात पहिल्यांदा अशी केस चीनमध्ये आढळली होती. 1997 मध्ये हाँगकाँगमधील एका पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लू झाला. तो सतत पक्ष्यांच्या संपर्कात असल्यामुळे हा विषाणू त्याच्यापर्यंत पोहोचला. हा विषाणू अत्यंत घातक आहे. एकदा संसर्ग झाला तर मृत्यूदर 60 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळेच याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या तरी माणसाकडून माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, फक्त पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच हा विषाणू झाला आहे. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे, विशेषतः पोल्ट्री फार्म किंवा पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी अधिक सावध राहावे.
हेही वाचा:























