मराठी भाषा दिनीच मराठीवर अन्याय! ठाणे महापालिकेच्या एका निर्णयावरून मोठी खळबळ, मराठीतून MA झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतवाढ बंद
मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठीत MA झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठाणे:एका बाजूला महाराष्ट्रात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, ठाणे महानगरपालिकेच्या एका निर्णयाने मराठी भाषा दिनादिवशीच मराठीवर अन्याय होत असल्याचा सूर दिसत आहे. ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या एका परिपत्रकानुसार, एमए (मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हटलंय परिपत्रकात?
पालिकेने याबाबत स्पष्टीकरण देणाऱ्या परिपत्रकात असं सांगितलंय कीसातव्या वेतन आयोगामध्ये शिक्षणावर आधारीत अतिरिक्त वेतनवाढी देय असण्याबाबत शासन निर्देश अद्याप प्राप्त झालेले नाही. यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए(मराठी) व तत्सम अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाºया अतिरिक्त वेतनवाढीबाबत प्रशासनाने अंतिम निर्णय आवश्यक असल्याचे निरिक्षण मुख्य लेखा परिक्ष यांनी नोंदविले होते. या निरिक्षणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आल्याने आता यापुढे अशा प्रकारचे शिक्षण घेणाºयांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे जे अशा पध्दतीने शिक्षण घेणार असतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे परिपत्रकार नमुद करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील जे अधिकारी, कर्मचारी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए(मराठी) व तत्सम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतात. त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती. तसा निर्णय महासभेत घेण्यात आला होता. या निर्णयामुळे पालिकेच्या कर्मचार्यांमध्ये मोठी नाराजी आहे. मराठी भाषा दिनाच्या दिवशीच हा निर्णय घेतल्याने तो मराठी भाषकांवर अन्याय करणारा आणि मराठीच्या अवमानासारखा असल्याचं बोललं जातंय.
मराठी भाषा दिनादिवशीच मराठीवर अन्याय
मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठी भाषक कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एमए (मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारी अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.महापालिकेच्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षणावर आधारित वेतनवाढीबाबत शासनाच्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए (मराठी) यांसारख्या अभ्यासक्रमासाठी मिळणारी वाढ यापुढे दिली जाणार नाही.यापूर्वी, पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यास वेतनवाढ दिली जात होती. मात्र, या नव्या निर्णयामुळे हा लाभ रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा:
Uday Samant On Kaviteche Gav कवीवर्य कुसुमाग्रज यांचे गाव होणार 'कवितेचे गाव'सामंतांची घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

