एक्स्प्लोर

Ajit Pawar On Jitendra Awhad: सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू आहेत, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; आव्हाडांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

Ajit Pawar On Jitendra Awhad: राज्यात सध्या गलिच्छ प्रकार सुरू असून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातील विनयभंगाचा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

Ajit Pawar On Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्याविरोधात  विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकारकडून पोलिसांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप करत सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आव्हाड यांनी राजीनामा न देण्याचे आवाहनही पवार यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत भाष्य केले.  जितेंद्र आव्हाड यांनी 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने कंटाळून राजीनामा देतो असे म्हटले. जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा विनंती आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी केले. ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिलीत. हे लक्षात घेता आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये असे अजित पवार यांनी म्हटले. 

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, जितेंद्र आव्हाड हे अनेकांना हाताने बाजूला करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी या महिलेला बाजुला केले. बाकी काही घडलेले नाही. मुख्यमंत्र्यांची कार काही फूट अंतरावरच होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढं येऊन विनयभंगाचा प्रकार घडला नसल्याचे सांगायला पाहिजे. तुम्ही कशाही प्रकारे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात, असेही पवार यांनी म्हटले.

महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. आव्हाडांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे हा भ्याडपणा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे. कोणतेही कारण नसताना जर लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे, अपमानित करण्याचे काम होत असेल तर जनतेने याची दखल घ्यायला हवी असे आवाहनही पवार यांनी केले. जितेंद्र आव्हाडांवरील हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.

राज्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला बगल देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अशा घटना समोर आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. विवियाना मॉल प्रकरणातील प्रेक्षकाने आव्हाड यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. तरीदेखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आला नाही. दिवस बदलतात. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात असे सांगताना अजित पवार यांनी नियमांचे, कायद्याचे पालन होत नसेल तर कोणत्याही पक्षाचा आमदार का असेना कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Embed widget