Maharashtra Breaking News Live Updates: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर राष्ट्रपतींकडून दु:ख व्यक्त
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशातील घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
LIVE

Background
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीची छापेमारी; भाईंदरमध्ये खळबळ
भाईंदर : भाईंदर येथील आरएनपी पार्क सोसायटीमधील कृष्णा सागर या इमारतीत राहणाऱ्या एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय (ED) तर्फे आज (31 जानेवारी) सकाळी छापेमारी करण्यात आली. दिल्लीतून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे.
या छाप्याचे नेमके कारण आणि संबंधित प्रकरणाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी ईडीकडून लवकरच अधिक तपशील दिला जाण्याची शक्यता आहे. भाईंदर आणि मुंबई पोलिसांकडून या कारवाईसंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. छापेमारीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, या कारवाईचे नेमके उद्दिष्ट काय आहे, हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अंबरनाथमध्ये शिक्षकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी; अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंबरनाथ: शहरामध्ये शिक्षकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अंबरनाथ पश्चिम येथील जावसई फुलेनगर भागातील एका शाळेतील ही घटना आहे. शिक्षक एकादशी राम असे शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुवर्ण मुकुटाने गौरव! अमरावतीत प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून जंगी स्वागत
अमरावती : भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दैदिप्यमान यश संपादन केले. त्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतर अमरावतीतील त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी भाजप अमरावती शहर अध्यक्ष प्रविण पोटे पाटील यांनी सुवर्ण मुकुट चढवत भव्य सत्कार केला.
प्रविण पोटे पाटील यांच्या इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयात भव्य स्वागत सोहळा पार पडला. फटाक्यांची आतीषबाजी, फुलांची उधळण करत क्रेनद्वारे हार टाकून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले...
भाजप दर पंधरवड्याला घेणार मंत्र्यांचा क्लास; संघटना मजबुतीचा प्रयत्न
भाजप दर पंधरवड्याला घेणार मंत्र्यांचा क्लास
सरकार मार्फत कामं करताना भाजपचा संघटना मजबुतीचा प्रयत्न
भाजप मंत्र्यांचे दर 15 दिवसांनी रिपोर्ट कार्ड तयार होणार
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवड्याला आढावा बैठक होणार
मंत्र्यांनी संघटनेमार्फत आलेली किती लोकोपयोगी कामे मार्गी लावली? याचा आढावा घेणार
मुख्यमंत्र्यांसोबत ही दर तीन महिन्यांनी भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आढावा घेणार
मुंबईत गरज भासल्यास भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत
मुंबईतील निरुत्साही सदस्य नोंदणीची भाजपच्या वरिष्ठांकडून गंभीर दखल
आज भाजप प्रदेश कार्यालयात बोलावली तातडीची बैठक
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबईचा आढावा घेणार
वन कर्मचाऱ्यांवरील हल्ला आणि वाहन जाळपोळ प्रकरणी 10 जणांना अटक
भंडारा: वाघानं शेतकरी महिलेवर हल्ला करून तिला ठार केलं. वाघाचा बंदोबस्त करावा या मागणीला घेवून ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचलेल्या वन कर्मचारी आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणून हिंसक वाळणं दिलं. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला करीत 15 वन कर्मचाऱ्यांना काठ्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर काहींनी वन विभागाचं वाहन पेटवून दिलं. ही घटना गुरुवाररी 30 जानेवारीच्या रात्री भंडाऱ्याच्या कवलेवाडा इथं घडली.
या प्रकरणी आता कारधा पोलीस ठाण्यात वन विभागाचं वाहन जाळणं आणि वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हमला करून शासकीय कामात अडथळा आणणं, असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत. वाहन जाळणे या गुन्ह्यात 7 जणांना तर वन कर्मचाऱ्यांवरील हल्ला प्रकरणी 3 जणांना अशा दोन्ही प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
