एक्स्प्लोर

IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी टी 20 मॅच पुण्यात होणार आहे. या सामन्यात विजयी झाल्यास भारत मालिका जिंकू शकतो.

Ind vs Eng Pune T20 Match पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील चौथा सामना आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानावर होणार आहे. या मैदानावर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया आणि जोस बटलरच्या नेतृत्त्वातील इंग्लंड यांच्यात लढत होईल. पुण्यातील टी 20 लढत जिंकून मालिका विजयाची संधी भारताकडे आहे. तर, आजची मॅच जिंकत मालिकेत बरोबरी करण्याची संधी इंग्लंडकडे आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात आज भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय. पुण्यातील स्टेडियमवर झालेल्या टी 20 लढतींमधील यापूर्वीची कामगिरी भारतासाठी चिंता वाढवणारी आहे. 

भारताकडे मालिका विजयाची संधी पण... 

भारतानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात पहिल्या दोन लढतींमध्ये विजय मिळवला होता. कोलकाता आणि चेन्नई येथे झालेल्या टी 20 लढतीमध्ये भारतानं विजय मिळवला. तर, राजकोट येथील तिसऱ्या टी 20 लढतीमध्ये इंग्लंडनं भारताला पराभूत केलं होतं. चौथ्या सामन्यापूर्वी भारतीय संघ मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकल्यास भारत मालिका जिंकू शकतो.  मात्र, पुण्यातील स्टेडियमवर भारतानं एकूण चार टी 20 सामने खेळले होते. त्यापैकी दोन सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला तर दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवण्यात टीम इंडियाला यश येणार का पाहावं लागेल. 

भारताचा पुण्यात इंग्लंडवर विजय 

भारतानं इंग्लंड विरुद्ध यापूर्वी पुण्यात एक टी 20 सामना खेळला आहे. त्या मॅचमध्ये भारतानं इंग्लंडला पराभूत केलं आहे. त्यामुळं आजच्या लढतीत भारतीय संघ पुन्हा तशी कामगिरी करतो का ते पाहावं लागेल. 

सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे लक्ष 

सूर्यकुमार यादव हा टी 20 क्रिकेटमधील टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र, पहिल्या तीन टी 20 सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करण्यात सूर्यकुमार यादवला अपयश आलं होतं. भारतानं पहिल्या तीन सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी केली. धावसंख्येचा पाठलाग करत असताना सूर्यकुमार यादवला त्याच्या नावलौकिकाप्रमाणं कामगिरी करण्यात अपयश आलं होतं. तिसऱ्या टी 20 लढतीत भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळं पराभवाचा सामना करावा लागला होता. 

दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं आतापर्यंत एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीवर भारतानं विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांनी दमदार कामगिरी केली. मात्र, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले.

इतर बातम्या : 

Team India Players Report Card Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या मैदानात उतरलेल्या दिग्गजांनी बीसीसीआयचं कापलं नाक! फक्त दोन खेळाडू पास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ranji Trophy : Vidarbha रणजी करंडकाच्या फायनलमध्ये, Man Of The Match Yash Rathod EXCLUSIVE ABP MajhaPm Modi And Sharad Pawar : मोदींनी पवारांचा हात पकडला, दोघांनी मिळून दीपप्रज्वलन केलं!Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 21 February 2025Raj Thackeray BMC : राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! मुंबईतील 3 मोठ्या विषयांवर पालिका आयुक्तांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Pope Francis Health Update : कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक
Gold Rates: शेअर मार्केट कोसळलं, सोन्यातील गुंतवणूक सर्वात सेफ पर्याय , जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
गुंतवणुकीचा सर्वात सेफ ऑप्शन, एक तोळा सोन्याचा दर 7000 ते 90000 पर्यंत कसा वाढला?
Embed widget