ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली 5 माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असून ते उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनिती आखली जात आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिलाय, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही अधिक्र सक्रीय होऊन शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला धक्का देत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्याचं दिसून येतय. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगरसंदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल असे म्हटले होते. त्यानुसार आता पडद्यामागून शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून अनेक माजी आमदारांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असून काँग्रेसचे माजी आमदार व पुण्यातील रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हेही धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली 5 माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असून ते उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामध्ये, 2 काँग्रेस नेते आणि 4 माजी आमदार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे समजते. तर, काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटेही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आजच भेट घेतली. काँग्रेसचे दोन नेते एकनाथ शिंदेच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, हुसेन दलवाई यांनी पक्षप्रवेशाचे वृत्त फेटाळले असले तरी रविंद्र धंगेकर यांच्या भेटीमुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा कायम आहे.
पुण्यातील हे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात
1) रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे माजी आमदार
2) महादेव बाबर, ठाकरे गटाचे माजी आमदार हडपसर
3) चंद्रकांत मोकाटे, कोथरूडचे माजी आमदार ठाकरे गट
रत्नागिरी
1) गणपत कदम, रत्नागिरीचे माजी आमदार ठाकरे गट
संगमेश्वर, अहिल्यानगर
1) सुभाष बने, संगमेश्वर माजी आमदार ठाकरे गट
1) रमाकांत म्हात्रे, कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर
हेही वाचा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
