एक्स्प्लोर

Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड

Beed News: अजित पवार यांनी गुरुवारी बीडमध्ये केलेलं भाषण गाजलं होतं. यावेळी अजित पवार यांनी बीडमधील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असे म्हटले असले तरी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता

ठाणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात झालेल्या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे प्रचंड मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विरोधक सातत्याने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्याची मागणी करत आहेत. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठोस पुरावे मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी भूमिका घेत धनुभाऊंना अभय दिले आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी परळीत आले असताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. मात्र, धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमधून जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे आपली दखल घेतली नव्हती, अशी खंत बोलून दाखवली आहे. 

धनंजय मुंडे यांच्यावर इतके गंभीर आरोप होऊनही अजित पवार यांनी त्यांना अभय दिले आहे. याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की,  पण हा माणूस नशीबवान आहे सगळे होऊनसुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत. मी किती कमनशिबी आहे . 2019 मंत्री झालो पालक मंत्री साठी चढाओढ सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते, पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे तीन  आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या, रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत. सत्य देवाला माहीत पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही. मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालक मंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली आणि काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर … अशा खूप जखमा आहेत.  पण कधीच हिशोब दिला नाही, की मी हे केले मी ते केले. 2004 ते 2014 जेव्हा कोणी उभे राहायला तयार नव्हते, तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघडपणाने दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लावायचो पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन. मीच करतो मीच करतो असे केले नाही, कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

अजितदादांच्या सगळ्यांदेखील धनंजय मुंडे यांना कानपिचक्या?

अजित पवार यांनी गुरुवारी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात मी पालकमंत्री म्हणून गुन्हेगारी खपवून घेणार नाही, असे निक्षून सांगितले होते. याशिवाय, अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले होते. अजित पवार यांनी म्हटले होते की, उगीचच मी नुसता आलो की, मला मोठा हार द्यायचा, बुके द्यायचा, पांडुरंगाची मूर्ती द्यायची. पण त्यांनी काय सांगितलंय ते पण बघा ना, साधुसंतांचे विचार आहेत, इतर काही गोष्टी आहेत. आता तुम्ही अपेक्षा करत असाल, आता दादा आलाय तर काही काळजी नाही, ते डोक्यातून काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका, असे अजित पवार यांनी म्हटले होते. अजितदादांच्या या वक्तव्याचा रोख धनंजय मुंडे यांच्या दिशेने होता का, अशी कुजबुज आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

आणखी वाचा

माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget