Kolhapur Bypolls Result 2022 : 'आमचा मुद्दा विकासाचा होता, मात्र जनतेचा निर्णय मान्य'; पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची भूमिका
Kolhapur Bypolls Result 2022 : कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत पराभवानंतर जनतेचा निकाल मान्य असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
![Kolhapur Bypolls Result 2022 : 'आमचा मुद्दा विकासाचा होता, मात्र जनतेचा निर्णय मान्य'; पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची भूमिका Kolhapur Bypolls Result 2022 bjp chandrkant opatil accept defeat says decision of people is accepted Kolhapur Bypolls Result 2022 : 'आमचा मुद्दा विकासाचा होता, मात्र जनतेचा निर्णय मान्य'; पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांची भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/f69101812c6a4683f3707682197f517d_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrakant Patil on Kolhapur Bypolls Result 2022 : कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. यावर प्रतिक्रिया देत मतदारांचा कौल मान्य असल्याचं भाजपं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, 'आम्हांला मतदारांचा निर्णय मान्य आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता. आम्ही वारंवार मांडत होतो की काँग्रेसने 50 वर्ष केंद्रात, राज्यात आणि शहरात काय केलं हे मांडा. आम्ही पाच वर्षात काय केलं हे मांडतो. मात्र आम्हांला राज्यात केवळ पाच वर्षे मिळाली. शहराच्या विकासासाठीचे अनेक प्रकल्प आम्ही केंद्राकडून मंजूर करुन घेतले आहेत. आता त्यांची टेंडर प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे विकास हाच आमचा मूळ मुद्दा होता.'
एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.
काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती.
यानिवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडलं होतं. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Rohit Pawar : 'लोकशाहीची ताकद कोल्हापूरकरांनी दाखवली, दडपशाहीचं राजकारण महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही'
- Amravati : 'मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून, हिम्मत असेल तर...'; खासदार नवनीत राणांचा शिवसैनिकांना इशारा
- Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC ट्रेनसंदर्भात मोठं अपडेट, जाणून घ्या काय असेल खास...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)