![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC ट्रेनसंदर्भात मोठं अपडेट, जाणून घ्या काय असेल खास...
Maharashtra News : एसी लोकल ट्रेनसाठी आवश्यक डिझाइन आणि तपशील अंतिम करण्यात आले आहेत. निविदा जारी करण्याच्या अंतिम प्रक्रियेवर काम सुरु आहे.
![Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC ट्रेनसंदर्भात मोठं अपडेट, जाणून घ्या काय असेल खास... mumbai local train now travel in mumbai local will be easier in 2023 ac local trains will be started Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC ट्रेनसंदर्भात मोठं अपडेट, जाणून घ्या काय असेल खास...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/03160634/Mumbai-AC-Local-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Local Train : मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच आणखी सुखकर होणार आहे. रेल्वे प्रशासन लवकरच सुधारीत नवीन एसी लोकल सुरु करण्याच्या विचारात आहे. मुंबईतील नवीन एसी लोकल ट्रेन 2023 मध्ये सुधारित आसन व्यवस्था आणि वाढीव प्रवासी जागांसह उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर सुरू धावण्याची अपेक्षा आहे. या गाड्यांमध्ये मेट्रोसारखी अत्याधुनिक आसनव्यवस्था असणारे डब्बे असतील. तसेच, आधीच्या गाड्यांच्या तुलनेत ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी अधिक जागा असेल. ट्रेनमध्ये सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र डब्बेही असतील. एक मोटर कोच सध्याचे सहा डबे आणि सामानासाठीच्या अतिरिक्त डब्ब्यांसह एकमेकांना जोडले जातील.
एअर सस्पेंशन सिस्टमचा वापर
ट्रेन चालवण्यासाठीची यंत्रणा ट्रेनच्या छतावर किंवा ट्रेनच्या डब्यांच्या खाली बसवली जाईल. ट्रेन बनवताना त्यामध्ये एअर सस्पेन्शन सिस्टीमचाही वापर करण्यात येईल. या एअर सस्पेन्शन सिस्टीममुळे प्रवाशांना सहज प्रवास करता येणार आहे.
2024 च्या अखेरीस पहिल्या टप्पा
मुंबई रेल विकास निगम (MRVC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'एसी लोकल ट्रेनसाठी आवश्यक डिझाइन आणि तपशील निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी निविदा जारी करण्याच्या अंतिम प्रक्रियेवर सध्या काम सुरु आहे.' मे महिन्याच्या अखेरीस निविदा निघण्याची शक्यता आहे. एसी गाड्यांचा पहिला टप्पा 2024 च्या अखेरीस धावण्याची शक्यता आहे.
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) 3A अंतर्गत 238 AC लोकल गाड्या खरेदी करेल. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत गाड्यांची खरेदी केली जाईल. सध्या पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार, मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), कल्याण-कर्जत रेल्वे स्थानकं आणि सीएसएमटी-पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर एसी लोकल धावत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Indian Railway : माटुंगा स्टेशनजवळ अपघात; दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे शेवटचे तीन डबे घसरले
- Indian Railway : रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात केला 'मोठा' बदल! प्रवाशांना मिळणार 'ही' सुविधा
- Indian Railway : जर तुम्हाला रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचे असेल, तर या बातमीवर क्लिक करा, सर्व माहिती मिळेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)