एक्स्प्लोर

Navneet Rana : 'मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून, हिम्मत असेल तर...'; खासदार नवनीत राणांचा शिवसैनिकांना इशारा

Navneet Rana Hanuman Chalisa : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं आहे.

Amravati : देशासह राज्यात सुरु असलेल्या भोंग्याचा वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं आहे. हनुमान चालीसा पठण न केल्यास मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

याला प्रत्युत्तर देत नवनीत राणा म्हणाल्या, 'मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी मला वेळ आणि जागा सांगावी. तेव्हा तेथे येऊन मी हनुमान चालीसा पठण करेन.' अमरावतीच्या खंडेलवाल नगरमधील पगडीवाले हनुमान मंदिर याठिकाणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, शुक्रवारी रात्री अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केलं. शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. यासह त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर शिवसेना कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. यावर टीका करत नवनीत राणा यांनी म्हटलं की, 'आम्ही दिवसाढवळ्या येऊन दनुमान चालीसा पठ करु, त्याच्यासारखं रात्री काळोखात आंदोलन करणार नाही.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET UG 2026 : नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?
नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?
Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार
NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी
NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Embed widget