Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर; असा असणार संपूर्ण दौरा
Cm Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या दौरा लक्षात घेता, पोलिसांकडून तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.

Cm Eknath Shinde: महाराष्ट्राचा 56 वा प्रांतीय निरंकारी संत समागम या सोहळ्याचे आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये (DMIC) करण्यात आले आहे. औरंगाबादेत पहिल्यांदाच 27 ते 29 जानेवारीदरम्यान आध्यात्मिक सोहळा पार पडत असून, यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित राहणार आहे. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत असे एक तास मुख्यमंत्री समागम सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पुण्याला रवाना होतील.
निरंकारी संत समागमाचे औरंगाबादेत 27 ते 29 जानेवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक सोहळ्यात सुमारे तीन लाख भाविक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा सोहळा एवढा भव्यदिव्य आहे की, यासाठी बिडकीन डीएमआयसीतील 300 एकर जागा त्यासाठी घेण्यात आली आहे. दरम्यान याच भव्यदिव्य सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या दौरा लक्षात घेता, पोलिसांकडून तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.
असा असणार मुख्यमंत्र्यांचा दिवसभराचा दौरा!
सकाळी 09.30 वाजता: वर्षा शासकीय निवासस्थान मुंबई येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण
सकाळी 10.00 वाजता: मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
सकाळी 11.00 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने बिडकीन औरंगाबादकडे प्रयाण
सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत: निरंकारी संत समागम कार्यक्रमास उपस्थिती व राखीव (बिडकीन डीएमआयसी पैठण औरंगाबाद)
दुपारी 12.30 वाजता: डीएमआयसी बिडकीन येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे रवाना
दुपारी 01.00 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय विमानाने पुणे विमानतळकडे रवाना
दुपारी 02.00 वाजता: पुणे विमानतळ येथे आगमन व मोटारीने भंडारा डोंगर ता. मावळम पुणेकडे प्रयाण
दुपारी 02.30 वाजता: श्री संत तुकाराम महाराज मंदिर व माघ दशमी सोहळ्यास उपस्थिती (श्री क्षेत्र भंडारा डोंगर ता.मावळ जिल्हा पुणे)
दुपारी 03. वाजता: भंडारा डोंगर येथून मोटारीने गावजत्रा मैदान भोसरीकडे प्रयाण
दुपारी 03.30 वाजता: इंद्रायणी थडी 2023 जत्रेस उपस्थित व राखीव
दुपारी 03.45 वाजता: वजत्रा मैदान, भोसरी येथून मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण
सायंकाळी 04.00 वाजता: कलावंती आई संप्रदायाचे खासदार निधीतून बांधलेले योगालयाचे उद्घाटन
सायंकाळी 04.30 वाजता: पुणे विमानतळावर आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण
सायंकाळी 05.15 वाजता: मुंबई विमानतळ येथे आगमन व तेथून मोटारीने मालाडकडे प्रयाण
सायंकाळी 05.45 वाजता: कलावंती आई संप्रदायाचे खासदार निधीतून बांधलेले योगालयाचे उद्घाटन
सायंकाळी 07.15 वाजता: मालाड येथून मोटारीने वर्षा निवासस्थानाकडे प्रयाण
रात्री 08.00 वाजता: वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
