अजित पवारांना बँक घोटाळ्याची धास्ती, म्हणून दिला राजीनामा; उपमुख्यमंत्र्यांची भर सभेत बिनधास्त कबुली
कायदे इतके कठोर झालेत, हे पाहून मी पण पीडीसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला अशी कबुली अजित दादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बँक घोटाळ्याच्या (Bank Scam) आरोपांची चांगलीच धास्ती घेतलीये. यातूनच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याअध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अशी जाहीर कबुली अजित पवारांनी दिली. पिंपरी चिंचवडमधील पीडिसीसी बँकेच्या (PDCC Bank) वाकड शाखेच्या स्थलांतर समारंभात अजित पवार बोलत होते. कायदे इतके कठोर झालेत, हे पाहून मी पण पीडिसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला अशी कबुली अजित दादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अजित पवार म्हणाले, मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. माझ्याबरोबर पवार साहेब होते. त्यांच्या हस्ते त्या बँकेचे उद्धटन झाले. त्या बँकेची अतिशय सुंदर इमारत होती. उद्घाटन केल्यानंतर आम्ही गाडीत बसलो. अन् गाडीत बसताच बँकेला लवकरचं टाळे लागणार, असं मी पवार साहेबांना म्हणालो. साहेब म्हणाले, तुला वेड लागलय का, काहीही कसा बोलत असतो. ते इतकी मोठी लोकं कशी बुडणार बँक? अन् आज या बँकेला टाळे लागले असून संचालक मंडळांना येत आहेत. अनेकांचे पैसे बुडाले. काही काही बँकेनी वाटोळे केले आणि अख्ख बोर्ड आज जेलमध्ये आहे. कायदे इतके कठोर झाले आहेत.
पीडीसीसी बँकेचा राजीनामा का दिला? अजित पवारांनी सांगितलं कारण
त्यामुळे हे सगळं पाहून विचार केला की, 30 -32 वर्षे येथे आहे. आता राजीनामा द्या. आत्ता जर वाटोळे केले तर यांचे जेलमध्ये जाऊ दे.. हे पाहून मी पण पीडीसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला, अशी कबुली अजित दादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पण असे असले तरी डोळ्यात तेल घालून आपल्याला बँका चालवाव्या लागणार आहेत, असे देखील अजित पवार म्हणाले.
मी टोपीवाल्या शेतकऱ्यांना दोष देतोय, अजित पवार 'असं' का म्हणाले!
लोकसभेत शेतकऱ्यांनी कंबरडे मोडल्याची कबुली स्वतः अजित पवारांनी दिली अन् तेव्हापासून शेतकऱ्यांच्या बाबतीत अजित दादा नरमाईच्या भूमिकेत दिसून आलेत. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या द्राक्ष परिषदेत याचीच प्रचिती आली. अलीकडे तरुणांचा कल शेतीकडे वाढल्याचं अन् टोपीवाले शेतकरी रोडावल्याचं दिसून येतं. इथं ही मला टोपीवाले मोजकेच शेतकरी दिसले. आता म्हणाल मी टोपीवाल्या शेतकऱ्यांना दोष देतोय. बाबांनो मला टोपीवाले अन बिन टोपीवाल्या शेतकऱ्यांची ही गरज आहे, असं अजित पवारांनी आवर्जून नमूद केलं.
हे ही वाचा :
तुम्हाला इथे काय झक मारायला ठेवलंय का? अजित पवारांनी सर्वांदेखत अधिकाऱ्याला झापलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
