लातूरमध्ये कोयता गँगची दहशत पोलिसांनी जागेवर मोडून काढली, धिंड काढत धडा शिकवला
Latur : पुणे शहरानंतर लातूरमध्ये देखील एका कोयता गँगने चांगलीच दहशत माजवली. या कोयता गँगने शुक्रवारी (दि.15)रात्रीच्या सुमारास दहशत सुरु केली होती.
Latur : पुणे शहरानंतर लातूरमध्ये देखील एका कोयता गँगने चांगलीच दहशत माजवली. या कोयता गँगने शुक्रवारी (दि.15)रात्रीच्या सुमारास दहशत सुरु केली होती. खंडणी वसुली करणे, गाड्यांची तोडफोड करणे, लोकांना दहशत दाखवणे, असा प्रकार या कोयता गँगने सुरु केला होता. दरम्यान, आता पोलिसांनी जिथे दहशत निर्माण केली, त्याच जागेवर नेत त्यांना धडा शिकवला आहे. पोलिसांनी या कोयता गँगची धिंड काढलीये.
ज्या भागात दहशत निर्माण केली, तिथेच नेत शिकवला धडा
लातूरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन जणांपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केलं होत. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांनी दहशत मिटवण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला आहे. कोयता गँगमधील दोन जणांपैकी एक तोहीत पठाण यास पोलिसांना पकडण्यात यश आलं होतं. तर यातील मोन्या बनसोडे हा अद्याप फरार आहे. यांनी ज्या ज्या भागात दहशत निर्माण केली होती. त्या त्या ठिकाणी तोहीत पठाण यास नेत पोलिसांनी उठबश्या काढायला लावल्या आहेत.
पोलिसांचे व्यापाऱ्यांना आवाहन
भाजीविक्रेते,फळ विक्रेते यांना कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी त्याच ठिकाणी नेऊन प्रसाद दिला आहे. ज्यांच्याकडून 100 पन्नास रुपये वसूल केले होते त्याच छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर नेत पोलिसांनी आरोपीला उठवशा काढायला लावलं आहे. रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी संपर्क क्रमांकही दिला आहे. अशाप्रकारे कोणी जर दहशत निर्माण करत असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्यात यावी. आम्ही त्याचा बंदोबस्त करू असंही व्यापाऱ्यांना पोलिसांनी आश्वासन दिलंय.
फळविक्री करणाऱ्यांना धमकी देत पैसे वसूल केले
कोयता गँगने रस्त्यावर भाजी आणि फळांची विक्री करणाऱ्या लोकांकडून धमकी देत पैसेही वसूल केले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली होती. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली. यात दोन जणांपैकी तोहीत पठाण पोलिसांच्या हाती लागला. तर मोन्या बनसोडे फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वीस-बावीस वर्षांचे तरुण मुलं हातात हत्यार घेत लोकांना दहशत दाखवत फिरत आहे. अशा गुंड प्रवृत्तीला चाप बसावा म्हणून एमआयडीसी पोलिसांनी यांनी ज्या भागात गुंडगिरी केली तेथेच त्यांना चोप दिला आहे. ज्यांच्याकडे हप्ते वसुली केली त्यांच्यासमोर उठबशा काढायला लावला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या