Latur Crime News : लातूर शहरात कोयता गँगची दहशत; लुटमार, गाड्यांच्या तोडफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Latur Crime News : शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लातूर शहरात तब्बल तीन तास कोयता गँगची दहशत सुरु होती.
Latur Crime News : पुणे शहरात (Pune City) पाहायला मिळालेली कोयता गँगची (Koyta Gang) दहशत आता लातूर शहरात (Latur City) देखील पाहायला मिळत आहे. कारण मागील काही दिवसांत लातूरमध्ये कोयता गँगची प्रचंड दहशत दिसून येत आहे. अशीच घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाहायला मिळाली असून, लातूर शहरात तब्बल तीन तास कोयता गँगची दहशत सुरु होती. खंडणी वसुली करणे, गाड्यांची तोडफोड करणे, लोकांना दहशत दाखवणे असा प्रकार शहरात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात दोन जणांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री नऊ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरात हा सर्व प्रकार सुरु होता.
लातूर शहरात दिवसेंदिवस गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढत आहे. 18 ते 25 वयोगटातील तरुण मंडळी हातात धारदार शस्त्र आणि कोयता घेऊन फिरत असतात. भाजी मार्केटमध्ये येऊन भाजीवाल्याकडून जबरदस्ती पैसे वसूल केली जातात. त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी आजूबाजूला उभे असलेल्या गाड्यांची तोडफोड केली जाते. लोकांच्या अंगावर धारदार शस्त्र घेऊन धावून जातात. काल रात्री असाच प्रकार दोन तरुणांनी केला आहे. तोहित पठाण आणि मोण्या बनसोडे असं या तरुणांचं नावं आहे.
गाड्यांची तोडफोड केली...
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील भाजी मार्केटमध्ये तोहित पठाण आणि मोण्या बनसोडे या दोघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी एक ट्रॅव्हल आणि एक कारची तोडफोड केली. यात अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान आले आहे. भाजीवाल्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्यात आले आहेत. बिडवे इंजीनियरिंग कॉलेजपासून गांधी चौकापर्यंत या तरुणांनी दहशत निर्माण केली होती. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर पोलिसांची दोन पथक रवाना केली. यातील तोहीत पठाण याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, मोन्या बनसोडे अद्याप फरार आहे. पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास सुरु आहे.
नागरिकांमध्ये प्रचंड दहशत...
मागील काही दिवसांपासून लातूर शहरात गुंडाची प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे. हातात कोयत्या सारखे शस्त्र घेऊ हे तरूण बिनधास्त मुख्य मार्केटमध्ये दहशत निर्माण करतांना पाहायला मिळत आहे. खंडणी देखील वसुल केले जाते. हातात शस्त्र पाहून छोटे-छोटे व्यावसायिक देखील घाबरुन जातात आणि त्यांना पैसे काढून देतात. त्यामुळे लातूर पोलिसांची गुंडांमधील दहशत संपली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, पोलिसांकडून अशा गुंडांवर कठोर कारवाई होणार की नाही? असा सवाल लातूरकर विचारत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :