एक्स्प्लोर

कोल्हापूर : तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले, म्हणणारा 'तो' ग्रामसेवक निलंबित, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट

एबीपी माझाच्या बातमीच्या दणक्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामसेवक राजेंद्र डवरीवर (मुम्मेवाडी ता. आजरा) निलंबनाची कारवाई केली.

कोल्हापूर : देशाच्या सीमेवर रक्षण करताना वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी शहीद झालेल्या ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले आहे. एबीपी माझाच्या बातमीच्या दणक्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामसेवक राजेंद्र डवरीवर (मुम्मेवाडी ता. आजरा) निलंबनाची कारवाई केली. याबाबत त्यांनी आदेश निर्गमित केला आहे.  

जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात 13 नोव्हेंबर 2020 रोजी पाकिस्तानी सैन्याशी प्रतिकार करताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडीमधील ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. त्या ऋषीकेश यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक डवरीकडून नाहक त्रास सुरु होता. डवरीपासून होत असलेल्या छळामुळे वडील रामचंद्र हरी जोंधळे आणि आई कविता यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून ग्रामसेवक डवरींपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. एबीपी माझाने या बातमीची दखल घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने तातडीने डवरीवर निलंबनाची कारवाई केली आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निर्गमित निलंबन आदेशात म्हटले आहे की, एबीपी माझामध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीच्या अनुषंगाने राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी यांनी शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटूंबीयांना नाहक त्रास देवून बदनामी केल्याचे दिसून येते. डवरी हे शासकीय कर्मचारी असून त्यांचे हे कृत्य न शोभणारे असून समाज भावना दुखावणारे आहे. त्यांच्या या कृत्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेची जनमानसातील प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यांना निलंबनाच्या कालावधीमध्ये कागल पंचायत समितीमध्ये हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

ग्रामसेवक डवरीकडून उर्मट भाषा

ऋषीकेश यांचे वडील रामचंद्र जोंधळे यांना ग्रामसेवक डवरीने तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले होते, असे अपशब्द वापरले होते. ज्या तिरंग्यातून ऋषीकेश यांचे पार्थिव आले होते तो तिरंगा सुद्धा बळजबरीने काढायला लावला होता. किरकोळ वादानंतर डवरीने गावामध्ये बदनामीकारक डिजिटल फलक लावला होता. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली होती. 

कुटुंबीयांची बदनामी होईल असा फलक

ग्रामसेवक राजेंद्र डवरी प्रेमी मित्र मंडळ असा सौजन्य असलेल्या बोर्डवर राजेंद डवरी भले मोठे कौतुक करणारे शब्द लिहिण्यात आले आहेत. त्या फलकावर राजेंद्र शंकरनाथ डवरी यांच्यावर 1 जून 2022 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास रामचंद्र हरिबा जोंधळे, लक्ष्मण हरिबा जोंधळे, पुंडलि सदाशिव जोंधळे आणि दीपक सदाशिव जोंधळे या चार हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याचे म्हटले आहे. सोबत राजेंद्र डवरी यांचा जखमी असलेला फोटो आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
SIP Investment :...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा 'तो' निर्णय ठरेल चुकीचा...
...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, मग सुरक्षित पर्याय कोणता? तज्ज्ञ म्हणाले...
Tanaji Sawant: 8 दिवसांपूर्वी दुबईवारी, आता 68 लाखांचं बिल, पप्पा रागावतील म्हणून.... तानाजी सावंतांच्या लेकाची इनसाईड स्टोरी
मित्रांसोबत चार्टर्ड प्लेनने बँकॉकला जाण्यासाठी तानाजी सावंतांच्या मुलाने 68 लाख भरले?
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षाRushikesh Sawant :  Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
SIP Investment :...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा 'तो' निर्णय ठरेल चुकीचा...
...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, मग सुरक्षित पर्याय कोणता? तज्ज्ञ म्हणाले...
Tanaji Sawant: 8 दिवसांपूर्वी दुबईवारी, आता 68 लाखांचं बिल, पप्पा रागावतील म्हणून.... तानाजी सावंतांच्या लेकाची इनसाईड स्टोरी
मित्रांसोबत चार्टर्ड प्लेनने बँकॉकला जाण्यासाठी तानाजी सावंतांच्या मुलाने 68 लाख भरले?
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारताच्या शेअर बाजाराला हादरे, गुंतवणूकदारांना धक्के सुरु,7.68 लाख कोटी बुडाले
Share Market : शेअर बाजारातील घसरण थांबेना,7.68 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांना धक्के सुरुच
Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
Embed widget