एक्स्प्लोर

SIP Investment :...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा 'तो' निर्णय ठरेल चुकीचा...

SIP Risk :एखाद्या गुंतवणूकदारानं लोकप्रिय एसआयपीद्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास तो अडचणीत सापडू शकतो. 

मुंबई : गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी लोकप्रिय प्रकार म्हणून गेल्या काही दिवसांपासून एसआयपीकडे पाहिलं जातं. एसआयपीद्वारे म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु आहे. या घसरणीचा परिणाम एसआयपी गुंतवणूकदारांवर देखील होत असतो. एसआयपीद्वारे ज्यांनी म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलीय त्यांना नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळं गुंतवणूक करताना योग्य प्लॅनची निवड करणं आवश्यक आहे. 

गुंतवणुकीच्या प्रवासाची सुरुवात करताना पहिला टप्पा एसआयपी म्हणजेच सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅन हा मानला जातो. एसआयपीद्वारे थोडी थोडी रक्कम जमा करुन तज्ज्ञांकडून संशोधनाच्या आधारे योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात. यातून त्यांना योग्य परतावा मिळत असतो. 

गुंतवणूक क्षेत्रातील जाणकारांकडून काही वेळा एसआयपी गुंतवणुकीसाठी योग्य नसल्याचं मानलं जातं. अनेकदा फंड मॅनेजर्स जे निर्णय घेतात ते चुकीचे ठरु शकतात. चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं केली गेलेली गुंतवणूक नुकसान करु शकते. यामुळं थेट इक्विटीमध्ये गुंतवणुकीऐवजी एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणं एकदम सुरक्षित आहे, असं मानलं जाऊ शकत नाही. यापूर्वी देखील एसआयपीकडून गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला होता.  त्यामुळं एसआयपीची गुंतवणूक कुठे होत आहे, कंपन्यांचं फंडामेंटल काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. 

आयसीआयसीआय प्रुटेन्शिअल म्यूच्युअलचे चीफ इन्वेस्टमेंट ऑफिसर एस नरेन यांच्या एसआयपीसंदर्भातील वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. चेन्नईत म्यूच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स  आणि इन्वेस्टमेंट मॅनेजर्सच्या बैठकीत त्यांनी एसआयपीच्या धोक्यासंदर्भात सतर्क केलं.  ते म्हणाले, जर कोणी लोकप्रिय एसआयपीद्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करत असेल तर तो संकटात सापडेल. 

शेअर बाजारात विक्रीचं सत्र सुरु असताना कमी किमतीवर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते. यापूर्वी 1994-2002 आणि 2006-2013 मध्ये एसआयपीधारकांना नुकसान सहन करावं लागलं होतं. त्या काळात मिडकॅपमधून रिटर्न मिळाले नव्हते. गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले होते. 

टॉप इन्वेस्टमेंट सल्लागार नरेन यांनी महागड्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं  कमी जोखमीचं असेल, असंही ते म्हणाले.  

इतर बातम्या : 

Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
Cars GST Price Cut : GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
Dharashiv Solapur Heavy Rain: गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
Ladki Bahin Yojana: सरकारने आमच्या घरात भांडणं लावली, निवडणूक संपल्यावर आमचे 1500 रुपये बंद केले, हिंगोलीत लाडक्या बहिणी आक्रमक
सरकारने आमच्या घरात भांडणं लावली, निवडणूक संपल्यावर आमचे 1500 रुपये बंद केले, हिंगोलीत लाडक्या बहिणी आक्रमक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
Cars GST Price Cut : GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
Dharashiv Solapur Heavy Rain: गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
Ladki Bahin Yojana: सरकारने आमच्या घरात भांडणं लावली, निवडणूक संपल्यावर आमचे 1500 रुपये बंद केले, हिंगोलीत लाडक्या बहिणी आक्रमक
सरकारने आमच्या घरात भांडणं लावली, निवडणूक संपल्यावर आमचे 1500 रुपये बंद केले, हिंगोलीत लाडक्या बहिणी आक्रमक
परंड्यातील वडनेरमध्ये पुरात कुटुंब अन्न पाण्याविना अडकलं, NDRF च्या साथीनं ओम राजेनिंबाळकर स्वत: पाण्यात उतरले, 18 तासानंतर सुखरुप सुटका
परंड्यातील वडनेरमध्ये पुरात कुटुंब अन्न पाण्याविना अडकलं, NDRF च्या साथीनं खासदार ओम राजेनिंबाळकर मदतीला, 18 तासानंतर सुखरुप सुटका
Solapur Heavy Rain: सोलापूरमध्ये धडकी भरवणारा पाऊस, सीना नदीच्या पाण्यात 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सोलापूरमध्ये धडकी भरवणारा पाऊस, सीना नदीच्या पाण्यात 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Rain Live: मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीडमधील शाळांना सुट्टी जाहीर; पुढील 24 तास अतिवृष्टीचा अलर्ट
Rain Live: मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीडमधील शाळांना सुट्टी जाहीर; पुढील 24 तास अतिवृष्टीचा अलर्ट
Satara News : साताऱ्यातील गजवडी गावातील गावकऱ्यांनी पेटवली क्रांतीची ज्योत, जमीन, घराच्या उताऱ्यावर पुरुषांसोबत महिलांची नावे
साताऱ्यातील गजवडी गावातील गावकऱ्यांनी पेटवली क्रांतीची ज्योत, जमीन, घराच्या उताऱ्यावर पुरुषांसोबत महिलांची नावे
Embed widget