Jalna Crime : 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं, मृतदेह गायरान जमिनीत जळालेल्या अवस्थेत सापडला
Jalna Crime : 21 वर्षीय तरुणाला जीवंत जाळलं, मृतदेह गायरान जमिनीत जळालेल्या अवस्थेत सापडला

Jalna Crime : जालन्यात एका 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने बदनापूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आकाश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आज दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गावातील गायरान जमिनीमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळून आलाय. दरम्यान मयत तरुणाची हत्या कोणी आणि कोणत्या कारणाने केली? याचा तपास पोलिसांनी सुरु केलाय. आकाश जाधवला आलेल्या एका फोन वरून पोलीस चौकशी करत असल्याची देखील माहिती आहे.
आकाश जाधव हत्याप्रकरणात पोलीस तपास सुरु
अधिकची माहिती अशी की, आकाश जाधव या 21 वर्षीय तरुणाची जिवंत जाळून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, आकाश जाधवची हत्या कशामुळे आणि कोणी केली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. दरम्यान, आकाशची अमानुषपणे हत्या करण्यात आल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय.
Wardha Crime : इन्स्टाग्राम स्टोरीवरुन वाद झाला अन् 17 वर्षीय तरुणाला जागेवर संपवलंhttps://t.co/GwyRU7RiMF
— ABP माझा (@abpmajhatv) February 9, 2025
कराड मध्ये वर्चस्व वादातून एका 22 वर्षीय युवकाला बेदम मारहाण
कराड शहरात वर्चस्व वादातून एका 22 वर्षीय युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवरील किंग ऑफ कराड पोस्टवरून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते आहे. कराड पोलिसांकडून शहरात संशयितांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. या मारहाण प्रकरणी जवळपास 20 जणांना ताब्यात घेतले आहे.घटनेमुळे रात्री कराड शहरात तणावाचे वातावरण होते.या घटनेतील मारहाणीत जखमी झालेल्या युवकावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.पोलिसांकडून मारहाण झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
Wardha Crime : इन्स्टाग्राम स्टोरीवरुन वाद झाला अन् 17 वर्षीय तरुणाला जागेवर संपवलंhttps://t.co/GwyRU7RiMF
— ABP माझा (@abpmajhatv) February 9, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
