IT Raid : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर विभागाची धाड
IT Raid : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
![IT Raid : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर विभागाची धाड IT Raid: Income Tax department raids premises of former NSE MD, CEO Chitra Ramkrishna Mumbai- Officials IT Raid : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर विभागाची धाड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/c9036bb96bad6a342105330091dae622_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IT Raid : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. रामकृष्ण या अलीकडेच सेबीच्या (SEBI) एका आदेशानंतर चर्चेत आल्या आहेत. ज्यात असे म्हटले आहे की, त्यांनी हिमालयातील एका योगींच्या सांगण्यावरून आनंद सुब्रमण्यम यांची एक्सचेंजचे समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) चे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या छापेमारीचा हेतू हा त्यांचा आणि इतरांविरुद्ध करचुकवेगिरी, आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करणे हा आहे. सेबीच्या आदेशात म्हटले आहे की, रामकृष्ण यांनी एनएसईच्या आर्थिक आणि व्यावसायिक योजनांसह काही अंतर्गत गोपनीय माहिती हिमालयातील या योगींशी शेअर केली. तसेच एक्सचेंजच्या कर्मचार्यांच्या कामगिरीचे मूल्यांकनाबाबतही त्यांनी या योगींचा सल्ला घेतला असल्याचे सेबीच्या आदेशात सांगणायत आले आहे.
सेबीने रामकृष्ण आणि इतर काही आरोपींना दंडही ठोठावला आहे. सेबीने रामकृष्ण यांना 3 कोटींचा दंड ठोठावल्याचं समजत आहे. सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीमध्ये संरक्षण कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. आनंद सुब्रमण्यन यांची समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) सल्लागार म्हणून नियुक्ती करताना संरक्षण कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते आहे.
तीन वर्ष एनएससीच्या एमडी आणि सीईओ राहिल्या आहेत चित्रा रामकृष्णा
चित्रा रामकृष्णा एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत एनएससीच्या एमडी आणि सीईओ होत्या. रामकृष्णा या योगींना सिरोमणी म्हणायच्या. जे त्यांच्या मते एक आध्यात्मिक शक्ती असून गेली 20 वर्षे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. रामकृष्णाच्या म्हणण्यानुसार, ही अज्ञात व्यक्ती किंवा योगी कथितरित्या एक आध्यात्मिक शक्ती होती, जी आपल्या इच्छेनुसार कुठेही प्रकट होऊ शकतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- सोमय्यांची लोक धिंड काढतील; अमित शाह, फडणवीसांच्या नावानं 400 कोटींची वसूली; राऊतांचा आरोप
- संजय राऊतांनी आरोप केलेले अमोल काळे लंडनला तर बाकीचे दुबईला पळाले : नवाब मलिक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)