
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मुलांबरोबर शर्यत; व्हिडीओ होतोय व्हायरल
Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह तेलंगणातील गोलापल्ली येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली.

Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) 50 दिवस पूर्ण झाले आहेत. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सतत भारत जोडो यात्रेशी जोडले जात आहेत. सध्या ही यात्रा तेलंगणात आहे. राहुल गांधींनी रविवारी गोलापल्ली जिल्ह्यातून तेलंगणातील प्रवासाला सुरुवात केली. या दरम्यान राहुल गांधी मुलांबरोबर धावताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेस कार्यकर्तेही धावताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ :
Out for a marathon, but let's sprint! 🏃♂️#BharatJodoYatra pic.twitter.com/d7GIbYQXXA
— Bharat Jodo (@bharatjodo) October 30, 2022
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान लहान मुलांशी संवाद साधला. त्यानंतर ते अचानक मुलांबरोबर धावू लागले. असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. याबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले जवानही धावू लागतात. भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.
राहुल गांधी आदिवासी बांधवांबरोबरही नाचताना दिसले
शनिवारी महबूबनगर जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी आदिवासी कलाकारांच्या गटाशी हस्तांदोलन केले. आदिवासी टोपी घालून कॉंग्रेस खासदार राहुल गांधी आदिवासींबरोबर पारंपारिक नृत्यात सामील झाले आणि पक्षाचे नेते तसेच यात्रेतील इतर सहभागींचा उत्साह वाढवला. तेलंगणामध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस आहे.
भारत जोडो यात्रा
गेल्या रविवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ब्रेक लागला होता. काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पदभार स्विकारणार होते. त्यासाठी खासदार राहुल गांधींना दिल्लीला जावे लागले. त्यामुळे भारत जोडो यात्रा तीन दिवस थांबवण्यात आली होती. मात्र, 27 ऑक्टोबर पासून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा पुढील वर्षी काश्मीरमध्ये संपेल.
महत्वाच्या बातम्या :
'मन की बात'मधून पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या छठ पुजेच्या शुभेच्छा; 'या' गोष्टींचाही केला उल्लेख
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
