एक्स्प्लोर
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Bollywood Interfaith Marriages : बॉलीवूडमध्ये, अनेक सेलिब्रिटींनी दाखवून दिले आहे की खऱ्या प्रेमाला मर्यादा नसतात, त्यांनी वेगवेगळ्या धर्मातील जोडीदार निवडले आणि एकत्र सुंदर आयुष्य जगले आहेत.

Bollywood Interfaith Marriages
1/13

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांची प्रेमकथा बॉलीवूड चित्रपटाप्रमाणेच आहे. शिबानी ख्रिश्चन आणि फरहान अख्तर मुस्लिम असूनही 2018 मध्ये त्यांच्या नात्याला सुरुवात झाली आणि विवाहबंधनात अडकले.
2/13

दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचे आंतरधर्मीय विवाह हे धार्मिक मतभेद असूनही प्रेम आणि सुसंवाद कसा निर्माण करू शकतात याचे एक सुंदर उदाहरण आहे. दीया, जी मूळची अर्धी हिंदू आणि अर्धी मुस्लीम आहे आणि वैभव हिंदू आहे. 2021 मध्ये त्यांनी विवाह केला.
3/13

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या आंतरधर्मीय विवाहाने लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले. कतरिना ख्रिश्चन आणि विक्की हिंदू असून त्यांनी डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले.
4/13

हिंदू प्रियंका आणि ख्रिश्चन निक यांची पहिली भेट 2017 च्या मेट गालामध्ये झाली आणि लवकरच त्यांचे नाते प्रेमात फुलले.
5/13

ख्रिश्चन जेनेलिया डिसूझा आणि हिंदू रितेश देशमुख यांना अक्षरशः ‘कपल गोल’ म्हणतात. ते 2003 मध्ये तुझे मेरी कसमच्या सेटवर भेटले आणि अनेक वर्षांच्या मैत्री आणि डेटिंगनंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केले.
6/13

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे नाते हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आंतरधर्मीय विवाहांपैकी एक आहे. मुस्लिम सैफ आणि हिंदू करीना यांना त्यांच्या धार्मिक मतभेदांमुळे आणि वयातील फरकामुळे बरीच चर्चा झाली.
7/13

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा विवाह हा आणखी एक यशस्वी आंतरधर्मीय विवाह आहे. शिल्पा, जी हिंदू आहे, आणि राज, जो शीख आहे, एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले आणि लवकरच मैत्री झाली. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केले.
8/13

मान्यता दत्त या नावाने ओळखली जाणारी दिलनवाज शेख आणि संजय दत्त यांची आंतरधर्मीय प्रेमकथा मजबूत आणि चिरस्थायी आहे. मुस्लिम मान्यता आणि हिंदू असलेल्या संजयने काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 2008 मध्ये लग्न केले.
9/13

सुनील शेट्टी आणि मना कादरी यांची एक सुंदर आंतरधर्मीय प्रेमकथा आहे जी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाली होती. सुनील शेट्टी हिंदू आहे,आणि मना कादरी मुस्लिम आहे. आव्हानांना न जुमानता 1991 मध्ये त्यांनी लग्न केले.
10/13

बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक, शाहरुख खान, जो मुस्लिम आहे आणि गौरी छिब्बर हिंदू आहे. यांनी अनेक आव्हानांचा सामना केला आहे, परंतु त्यांची प्रेमकथा लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. शाहरुख एका पार्टीत गौरीला भेटला आणि त्यावेळी तो 18 वर्षांचा होता आणि गौरी 14 वर्षांची होती.
11/13

ज्येष्ठ अभिनेते हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनीही आंतरधर्मीय विवाह केला होता, जो उल्लेख करण्यासारखा आहे. ही जोडी बॉलीवूडच्या सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक बनली. त्यांनी 1980 मध्ये लग्न केले.
12/13

मुमताज, बॉलीवूडच्या सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आणि मयूर माधवानी, जो युगांडन-भारतीय वंशाचा यशस्वी व्यापारी आहे, यांचीही एक सुंदर आंतरधर्मीय प्रेमकथा आहे. नावावरूनच स्पष्ट होते की मुमताज मुस्लिम आहे तर दुसरीकडे मयूर हिंदू आहे.
13/13

बॉलीवूडमधील प्रसिद्ध आंतरधर्मीय विवाहांबद्दल बोलत असताना, नर्गिस आणि सुनील दत्त यांच्याबद्दल बोलल्याशिवाय कसे राहणार? मुस्लिम असलेल्या नर्गिस आणि हिंदू असलेले सुनील दत्त 1957 मध्ये मदर इंडियाच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले. अनेक जनरेशन झेडला हे माहीत नसेल, पण मदर इंडियाच्या शूटिंगदरम्यान सुनीलने धैर्याने नर्गिसला सेटवर लागलेल्या आगीपासून वाचवले होते.
Published at : 30 Nov 2024 11:08 AM (IST)
Tags :
Riteish Deshmukh Priyanka Chopra Shilpa Shetty Katrina Kaif Sanjay Dutt Hema Malini SHAH RUKH KHAN Farhan Akhtar Suniel Shetty Nick Jonas Dharmendra Dia Mirza Shibani Dandekar Gauri Vaibhav Rekhi Nargis Sunil Dutt Raj Kundra Vicky Kaushal Kareena Kapoor Mumtaz Mayur Madhvani Mana Kadri Dilnawaz Sheikh Saif Ali Khan Genelia D’Souzaअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
राजकारण
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
