एक्स्प्लोर

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनामध्ये (GST Collection) मोठी वाढ झाली आहे.

GST Collection : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनामध्ये (GST Collection) मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात जीएसटी संकलन 8.5 टक्क्यांनी वाढून 1.82 लाख कोटी रुपये झाले आहे. ही GST संकलनात मोठी वाढ मानली जात आहे. या वाढीमुळं देशाच्या तिरोजीत मोठी भर पडली आहे. 

नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात मोठी वाढ 

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी (GST) संकलनात मोठी वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 14.57 लाख कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. तर नोव्हेंबर महिन्यात 1.82 लाख कोटी रुपयांचे GST संकलन झालं आहे. ऑक्टोबरमध्ये सकल GST संकलन 9 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटींहून अधिक झाले आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 33,821 कोटी रुपये, राज्य जीएसटी 41,864 कोटी रुपये, एकात्मिक IGST रुपये 99,111 कोटी आणि उपकर 12,550 कोटी रुपये होते.

जीएसटीमध्ये लवकरच बदल होण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत जीएसटी करप्रणालीत मोठे बदल पाहायला मिळू शकतात. याचे कारण म्हणजे जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांच्या दोन गटांची नुकतीच झालेली बैठक आणि त्यांनी आपला अहवाल जीएसटी परिषदेला सादर करणे. यामध्ये आरोग्य विमा प्रीमियमवरील जीएसटी हटवण्यासंबंधीचा निर्णय आहे. 21 डिसेंबर रोजी जैसलमेरमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे, ज्यामध्ये आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटीमधून सूट किंवा दर कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील आणि त्यांच्या राज्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असलेली परिषद दरांमध्ये सुसूत्रता आणण्याबाबत काही निर्णय घेऊ शकते. राज्य मंत्र्यांच्या समितीच्या शिफारशींनुसार, सामान्य वापराच्या अनेक वस्तूंवरील कराचे दर 12 टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकतात.

विम्यावर जीएसटी

जीएसटी कौन्सिलने ट्विटरवर पोस्ट केले की जीएसटी कौन्सिलची 55 वी बैठक 21 डिसेंबर 2024 रोजी जैसलमेर, राजस्थान येथे होणार आहे. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत परिषदेने GOM ला विम्यावर GST लादण्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. ऑक्टोबरअखेर या अहवालाला अंतिम स्वरूप देण्यात येणार होते. गेल्या महिन्यात, आरोग्य आणि जीवन विमा उत्पादनांवर GST लादण्यासंदर्भात मंत्री गटाची (GoM) बैठक झाली.

महत्वाच्या बातम्या:

GST Council : 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 18 टक्के GST भरावा लागणार? पेमेंट कंपन्यांचे धाबे दणाणले

महत्त्वाच्या बातम्या

Rappid Valves : BHEL कडून भारतीय नौदलाच्या 18 कोटी रुपयांच्या कामाची ऑर्डर मिळाली, रॅपिड व्हॉल्वजवर पैशांचा पाऊस, शेअर 40 रुपयांनी वाढला
भारतीय नौदलाच्या 18 कोटी रुपयांच्या कामाची BHEL कडून ऑर्डर,रॅपिड व्हॉल्वजच्या शेअरमध्ये तुफान तेजी
E100 :पेट्रोलची जागा इथेनॉल घेणार? E100 ला मंजुरी, नितीन गडकरींचा निर्णय गेमचेंजर ठरणार, क्रूड ऑईल आयातीवरील खर्चाचा दबाव कमी होणार
पेट्रोलची जागा इथेनॉल घेणार? E100 ला मंजुरी, नितीन गडकरींचा निर्णय गेमचेंजर ठरणार?
Gold Silver Price: अमेरिका-इराण युद्ध थांबताच चित्र फिरलं, सोने-चांदी दरात मोठी वाढ, एक तोळा सोन्याचा आजचा भाव किती?
अमेरिका-इराण युद्ध थांबताच चित्र फिरलं, सोने-चांदी दरात मोठी वाढ, एक तोळा सोन्याचा आजचा भाव किती?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
Weather Update: सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका
अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका
बीड-जालन्यातही रस्त्यालगत धोकादायक विहिरी; तीन दिवसांत 2 अपघात, 4 जणांचा मृत्यू, ना सुरक्षा कठडे ना उपाययोजना
बीड-जालन्यातही रस्त्यालगत धोकादायक विहिरी; तीन दिवसांत 2 अपघात, 4 जणांचा मृत्यू, ना सुरक्षा कठडे ना उपाययोजना
TV Actress Sanchita Ugale: प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगलेनं आयुष्य संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वीचा 'तो' VIDEO होतोय व्हायरल
प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगलेनं आयुष्य संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वीचा 'तो' VIDEO होतोय व्हायरल
Pandharpur Accident 8 death : आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन देवदर्शन, घरी येण्यापूर्वी फोन केला अन् परत येताना घात झाला, पंढरपूरच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत
आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन देवदर्शन, घरी येण्यापूर्वी फोन केला अन् परत येताना घात झाला, पंढरपूरच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Embed widget