देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
Debt Ratio increased : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील जनतेच्या डोक्यावरील कर्जाचा (Debt) भार दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे.
Debt Ratio increased : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील जनतेच्या डोक्यावरील कर्जाचा (Debt) भार दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीणसह शहरी भागातील (Rural and Urban Areas) जनता कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण शहरी भागापेक्षा जास्त आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी आहेत.
ग्रामीण भागात कर्जबाजारीपणाचं प्रमाण जास्त
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये कर्जाच्या संदर्भातील माहिती दिली आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, लोकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. शहरी भागांतील लोक इएमआयवर वस्तू खरेदी करतात, असे मानले जाते. मात्र, ग्रामीण भागातील लोक देखील मोठ्या प्रमाणात इएमआयवर वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात कर्जबाजारीपणाचं प्रमाण जास्त असल्याची माहिती अहवालात सांगण्यात आली आहे.
ग्रामीण भागात इएमआयवर वस्तू खरेदीचं प्रमाण जास्त
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 1 लाख लोकांमागे 18 हजार 322 जण कर्जबाजारी झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या व्यापक वार्षिक मॉड्यूलर सर्वेक्षणात देण्यात आली आहे. या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार इएमआयवर वस्तू खरेदी करण्यामध्ये
शहरी भागातील प्रमाण 17.44 टक्के आहे. तर ग्रामीण भागातील प्रमाण हे 18.7 टक्के आहे. ग्रामीण भागत कर्ज घेणाऱ्याचं प्रमाण हे 6 टक्क्यांनी वाढलं आहे, तर शहरी भागात हेच प्रमाण 2.8 टक्के एवढं आहे. यावरुन ग्रामीण भागात इएमआयवर वस्तू खरेदीचं प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
ह ग्रामीण भागातील कुटुंबाचा मासिक खर्च, महिलांवरही कर्जाचं प्रमाण वाढलं
अहवालात दिलेल्या माहितीनुसार शहरीसह ग्रामीण भागातील कुटुंबाचा मासिक खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या खर्चामुळं देखील कर्जबाजारीपणाचं प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये ग्रामीण भागात कुटुंबाचा खर्च 164 टक्क्यांनी वाढला आहे, तर शहरी भागात कुटुंबाचा खर्च हा 146 टक्क्यांनी वाढल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. याचं कारण म्हणजे वाढता उत्पादन खर्च आणि घटते उत्पादन हे आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य बाजारभाव नसणे हे देखील कर्जबाजारी होण्याचं कारण आहे. दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील महिलांचे कर्ज गेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत शहरी भागातील महिलांचे कर्ज घेण्याचं प्रमाण कमी आहे. 1 लाख महिलांमागे ग्रामीण भागत 13 टक्के महिला कर्ज घेतात, तर शहरामध्ये 1 लाख महिलांमागे 10 टक्केच महिला कर्ज घेतात. या आकडेवारीवरुन ग्रामीण भागात महिलाचं कर्ज घेण्याचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: