राफेल विमानांचं भारतीय भूमीवर सुरक्षित लॅण्डिंग, अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये दाखल
Rafale In India | The Birds have landed safely in Ambala' असं ट्वीट करत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांनी अंबालामध्ये लॅण्डिंग केल्याची माहिती दिली.
अंबाला : फ्रान्सवरुन सुमारे 7000 किलोमीटर प्रवास करुन आलेल्या पाचही राफेल लढाऊ विमानांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये सुरक्षित लॅण्डिंग केलं आहे. 'The Birds have landed safely in Ambala', असं ट्वीट करत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांनी अंबालामध्ये लॅण्डिंग केल्याची माहिती दिली. शिवाय राफेलच्या लॅण्डिंगचा व्हिडीओ देखील राजनाथ सिंह यांनी ट्वीट केलं आहे.
दरम्यान अंबाला एअरफोर्स स्टेशन परिसरात गर्दी होण्याच्या शक्यतेने हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने इथे कलम 144 (जमावबंदी) लावण्यात आलं आहे. याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे.
राफेल विमानांना पक्ष्यांची उपमा देत लॅण्डिंगविषयी माहिती देताना राजनाथ सिंह यांनी लिहिलं आहे की, "पक्ष्यांनी अंबालामध्ये सुरक्षित लॅण्डिंग केलं आहे. राफेल विमानं भारतात दाखल होणं ही भारतीय सामर्थ्याच्या नव्या युगाची सुरुवात आहे. या विमानांनी भारतीय वायुदलाचं सामर्थ्य वाढलं आहे."The Touchdown of Rafale at Ambala. pic.twitter.com/e3OFQa1bZY
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 29, 2020
The Birds have landed safely in Ambala.
The touch down of Rafale combat aircrafts in India marks the beginning of a new era in our Military History. These multirole aircrafts will revolutionise the capabilities of the @IAF_MCC. — Rajnath Singh (@rajnathsingh) July 29, 2020
भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करतानाच दोन सुखोई-30 MKI या विमानांनी राफेलच्या तुकडीला एस्कॉर्ट केलं होतं.
The five Rafales escorted by 02 SU30 MKIs as they enter the Indian air space.@IAF_MCC pic.twitter.com/djpt16OqVd
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) July 29, 2020
भारत सरकारने हवाई दलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
आतापर्यंत भारताकडे सुखोईच्या रुपात चौथ्या पीढीचं लढाऊ विमान होतं आता राफेलच्या रुपात 4.5 पीढीचं विमान भारताच्या ताफ्यात दाखल झालं आहे. राफेलची ताकद जबरदस्त आहेच, शिवाय याची मारक क्षमता अतिशय भेदक आहे.
Welcome home 'Golden Arrows'. Blue skies always.
The Arrow formation (Rafales) was given ceremonial welcome by SU-30s.#IndianAirForce #RafaleInIndia #Rafale pic.twitter.com/RP0wITfTPZ — Indian Air Force (@IAF_MCC) July 29, 2020
PHOTO | भारतात येताना राफेल विमानात 30 हजार फूट उंचीवर इंधन भरलं, पाहा खास फोटो
राफेल विमानं आज भारतीय भूमीत लॅण्ड होणार, अंबाला एअरफोर्स स्टेशन परिसरात कलम 144
अंबाला एअरफोर्स स्टेशनचं महत्त्व काय? अंबाला हे सामरिक महत्त्वाचं मिलिट्री बेस आहे. इथे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात आहे. याशिवाय हवाई दलाचं मिग-21 'बायसन' आणि जॅग्वार लढाऊ विमांनाचे स्क्वॉड्रनही इथे तैनात आहेत. याशिवाय भारतीय सैन्याचा खड़्ग स्ट्राईक कोरचं (2 कोर) मुख्यालयही अंबाला एअरबेसच्या अतिशय जवळच आहे. त्यामुळे हे संवेदनशील क्षेत्र असून शत्रूचं त्यावर नजर असते.
राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये
1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.
2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
3. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.
4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.
6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.
8. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.
संबंधित बातम्या
शत्रूला धडकी भरवण्याठी राफेल येतंय....29 जुलैला भारतात दाखल होणार!
Rafale | राफेल विमान भारताला सुपूर्द, पहिल्या राफेल विमानातून संरक्षणमंत्र्यांचं उड्डाण