Manisha Bidve : कळंबच्या महिलेची हत्या केली, उसतोड कामगार असलेला आरोपी गोव्याला गेला; मुख्य साक्षीदाराची मोठी माहिती
Manisha Bidve Murder : संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कळंबच्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात रामेश्वर उर्फ राण्या भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी आरोपींची नावं आहेत.

बीड : कळंबमध्ये झालेल्या महिलेच्या हत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महादेव घुले यांच्यासोबत एबीपी माझाने संवाद साधला. ती महिला आपल्याला छळत असल्याची माहिती आरोपी रामेश्वर भोसलेने दिली होती असं महादेव घुलेने सांगितलं. कळंबमधील मनीषा बिडवेची तिचा ड्रायवर रामेश्वर भोसलेकडून हत्या करण्यात आली होती. उस्मान गुलाब सय्यद असं दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. मनीषाची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
कळंबमधील मनिषा बिडवे या महिलेची हत्या 22 मार्च रोजी झाली होती. पण 29 मार्च रोजी ही हत्या उघडकीस आली. पोलिसांना या हत्येची माहिती महादेव घुले यानेच दिली होती. आता महादेव घुलेने इतरही काही माहिती एबीपीशी बोलताना दिली आहे.
आरोपी ऊसतोड काम करायचा
महिला हत्या प्रकरणातील आरोपी रामेश्वर भोसले महादेव घुले यांच्याकडे ऊसतोडणीचं काम करायचा. कळंब येथील महिला त्रास देत असल्याचं रामेश्वर भोसले याने महादेव घुलेला आठ दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर रामेश्वर भोसलेने त्या महिलेचा खून केल्याचं रामेश्वरच्या मित्राकडून महादेव घुलेला माहिती मिळाली
रामेश्वरने खून केलाय त्याला वाचवा असं त्याचा मित्र फोन करून सांगायचा अशी माहिती महादेव घुलेने दिली. तसेच रामेश्वर भोसले टाकळी इथ काम करत असताना सुदर्शन घुलेच्या संपर्कात आला नसल्याचं महादेव घुले यांच मत आहे. महिलेचा खून केल्यानंतर आरोपी गोव्याला गेले आणि तिथून फोन केल्याची माहिती महादेव घुले याने दिली.
महादेव घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुळेच्या टाकळी गावचाच रहिवासी आहे. मात्र सुदर्शन घुलेशी आपला काहीही संबंध नसल्याचं महादेव घुले यांनी सांगितलं.
Manisha Bidve Murder Case : मनीषा बिडवेच्या हत्येचा थरार
- संतोष देशमुखांचे मनीषा बिडवेशी अनैतिक संबंध दाखवण्याचा डाव होता.
- याच मनिषा बिडवेची 22 मार्च रोजी हत्या, तर 29 मार्चला हत्या उघडकीस आली.
- मनीषा बिडवे छळत असल्यानं हत्या केल्याचा रामेश्वर भोसलेचा दावा.
- मनिषाची हत्या करुन रामेश्वर दोन दिवस त्याच घरात वास्तव्याला होता.
- दोन दिवस मनिषाच्या मृतदेहाच्या शेजारी बसूनच रामेश्वरचे जेवण.
- तीन दिवसांनंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर रामेश्वर फरार.
- फरार होण्यासाठी रामेश्वरनं वापरली महिलेचीच गाडी.
- हत्येनंतर रामेश्वरनं केजच्या मित्राला कळंबला नेऊन मृतदेह दाखवला.
- हत्येच्या दिवशी मनिषाने उठाबशाही काढायला लावल्याचा रामेश्वरचा दावा.
ही बातमी वाचा:























