खेळाडूंच्या पाया पडण्यासाठी मैदानात घुसणाऱ्या अतिउत्साही चाहत्यांना कोणती शिक्षा होते?
Rules If Fan Enters in Cricket Ground : खेळाडूंच्या पाया पडण्यासाठी मैदानात घुसणाऱ्या अतिउत्साही चाहत्यांना कोणती शिक्षा होते?

Rules If Fan Enters in Cricket Ground : क्रिकेटचा सामना सुरु असताना अतिउत्साही चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी उड्या टाकून मैदानावर धावत येतात. नियमांचे उल्लंघन करुन आवडत्या खेळाडूंच्या पाया पडण्यासाठी अनेक चाहते मैदानात आलेले पाहायला मिळाले आहेत. मात्र, जर तुम्हीही असे काही करण्याच्या तयारीत असाल तर थोडे सावध राहा. कारण जबरदस्तीने मैदानात घुसल्यावर चाहत्यांसाठी कठोर शिक्षा देण्यात येते.
खरंतर गेल्या 26 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सामना गुवाहाटी येथे खेळला गेला. या सामन्यात कोलकाताची फलंदाजी सुरु असताना एक चाहत उड्या मारून आला आणि धावत मैदानात घुसला. तो राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार रियान परागचे चरण स्पर्श करण्यासाठी मैदानात घुसला होता. त्यानंतर रियान परागला त्याने मिठी मारलीये. त्यामुळे हा सामना काही मिनीटं थांबवावा लागला होता. मात्र, त्यानंतर सुरक्षा रक्षक त्याला तिथून घेऊन गेले.
गेल्या काही महिन्यांत चाहत्यांनी जबरदस्तीने क्रिकेट मैदानात घुसून आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटण्याचे प्रकार वाढवले आहेत. दरम्यान, अशा कृतीवर सुरक्षा रक्षक त्वरित कारवाई करतात. पण फक्त मैदानाबाहेर काढून काम होतं का? तर असम नाही. असे चाहते जेव्हा पकडले जातात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते. आयसीसी अशा प्रकारच्या कृतींवर कठोर नजर ठेवते. कारण चाहत्यांनी मैदानात घुसणे हे थेट सुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे. अशा वेळी मैदानाला मायनस पॉइंट्स दिले जातात आणि सलग तीन घटनांनंतर त्या मैदानावरही बंदी घातली जाते.
अतिउत्साही चाहत्यांना खावी लागू शकते जेलची हवा
आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी आलेल्या अशा चाहत्यांना फक्त मैदानाबाहेरच काढले जात नाही, तर जर त्याने पुन्हा पुन्हा या प्रकारची कृती केली तर त्यावर आयुष्यभर स्टेडियममध्ये येण्यावर बंदी घातली जाते. तथापि, अनेक प्रकरणांमध्ये 5 ते 10 वर्षांचाही बंदी घातली गेली आहे. अनेक देशांमध्ये असे केल्यास आर्थिक दंडही आकारला जातो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये हजारो डॉलर्सचा दंड होऊ शकतो. विदेशात असं काही केल्यास चाहत्याला सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवासही होऊ शकतो.
भारतातही होऊ शकते कठोर शिक्षा
बीसीसीआय देखील या प्रकारच्या कृतींवर कठोर नजर ठेवते आणि याला कठोरपणे रोखण्यासाठी स्टेडियमला कठोर सूचना दिल्या जातात. भारतात जर कोणी असे केले तर त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 447 म्हणजेच गुन्हेगारी घुसगोरी अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तिकिटाच्या मुद्द्यावरुन काव्या मारनच्या टीमला घेरलं; ब्लॅकमेलिंग प्रकरणी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींची मोठी घोषणा




















