एक्स्प्लोर
PHOTO | भारतात येताना राफेल विमानात 30 हजार फुट उंचीवर इंधन भरलं, पाहा खास फोटो
1/6

एकूण 36 राफेल विमानं फ्रान्स भारताला 2021 पर्यंत देणार आहे. 36 विमानांसाठी 59 हजार कोटींचा करार फ्रान्ससोबत झाला आहे.
2/6

हवामान स्वच्छ राहिल्यास ही विमाने अंबाला इथल्या वायुसेना तळावर 29 जुलै 2020 रोजी पोहोचतील अशी अपेक्षा आहे. या नव्या राफेल विमानांसाठी भारतीय वायुसेनेची 17 क्रमांकाची स्क्वाड्रन 'गोल्ड्न अॅरो' अंबाला वायुसेना तळावर उभारण्यात आली आहे.
3/6

फ्रान्सच्या दासो कंपनीतून मागवलेली ही सर्व विमाने दोन टप्प्यांमध्ये भारतात येतील. ह्या पहिल्या टप्प्यातील पाच विमाने भारतीय वायुदलाचे विशेष प्रशिक्षित वैमानिक उड्डाण करून घेऊन येत आहेत.
4/6

भारतीय वायुदलाच्या पहिल्या पाच राफेल विमानांनी फ्रान्सच्या मेरीन्याक इथल्या दासो कंपनीच्या तळावरुन काल उड्डाण केलं. यातील तीन विमाने एक आसनी, तर दोन विमाने दोन आसनांची आहेत.
5/6

फ्रान्समधील भारतीय अॅम्बेसीने विमानात इंधन भरतानाचे फोटो ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. राफेल विमानं यूएईच्या फ्रान्सिस मिलिट्री बेसवर थांबली होती.
6/6

फ्रान्सवरुन पाच राफेल विमानं बुधवारी अंबाला वायुसेनेच्या बेसवर पोहोचतील. जवळपास 7 हजार किमीच्या प्रवासादरम्यात विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आलं.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























