राफेल विमानं आज भारतीय भूमीत लॅण्ड होणार, अंबाला एअरफोर्स स्टेशन परिसरात कलम 144
Rafale Fighter Jets | फ्रान्सहून जवळपास 7000 किमी प्रवास करुन राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन इथे पोहोचणार आहेत. छोटेखानी समारंभात राफेल विमानं हवाई दलात सामील केले जातील.
Rafale Fighter Jets | अंबाला : फ्रान्सहून रवाना झालेले पाच राफेल लढाऊ विमान आज (29 जुलै) भारताला मिळणार आहेत. सुमारे 7000 किमी प्रवास करुन राफेल विमानांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन इथे पोहोचतील. भारतात येताना विमानं 30 हजार फूट उंचीवर असताना त्यात इंधन भरण्यात आलं. अंबाला एअरफोस्ट स्टेशन परिसरात गर्दी होण्याच्या शक्यतेने हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने इथे कलम 144 (जमावबंदी) लावण्यात आलं आहे. याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे.
भारत सरकारने हवाई दलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
अंबालाचं महत्त्व काय? अंबाला हे सामरिक महत्त्वाचं मिलिट्री बेस आहे. इथे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात आहे. याशिवाय हवाई दलाचं मिग-21 'बायसन' आणि जॅग्वार लढाऊ विमांनाचे स्क्वॉड्रनही इथे तैनात आहेत. याशिवाय भारतीय सैन्याचा खड़्ग स्ट्राईक कोरचं (2 कोर) मुख्यालयही अंबाला एअरबेसच्या अतिशय जवळच आहे. त्यामुळे हे संवेदनशील क्षेत्र असून शत्रूचं त्यावर नजर असते.
शत्रूला धडकी भरवण्याठी राफेल येतंय....29 जुलैला भारतात दाखल होणार!
PHOTO | भारतात येताना राफेल विमानात 30 हजार फूट उंचीवर इंधन भरलं, पाहा खास फोटो
हवाई दल प्रमुख राफेलचं स्वागत करणार दुपारी एक ते तीन दरम्यान कोणत्याही वेळी राफेल लढाऊ विमान अंबाला एअरबेसवर पोहोचतील. भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया आज अंबाला एअरफोर्स स्टेशनवर पाचही राफेल लढाऊ विमानांचं स्वागत करणार आहेत. छोटेखानी समारंभात राफेल विमानं हवाई दलात सामील केले जातील. मीडियालाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाही.
आर के एस भदौरिया यांनी काल एअरफोर्स स्टेशनचा दौरा केला आणि 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनची पुन्हा गठन केलं. एअर चीफ मार्शल यांनी राफेलच्या स्वागताच्या तयारीचा आढावा घेतला. एलएसीवर तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन सीमेवर राफेल तैनात केलं जाऊ शकतं. राफेल विमानांच्या उड्डाणासाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये 1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती. 2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे. 3. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं. 4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. 5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे. 6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे. 7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं. 8. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.संबंधित बातम्या
Rafale | राफेल विमान भारताला सुपूर्द, पहिल्या राफेल विमानातून संरक्षणमंत्र्यांचं उड्डाण