एक्स्प्लोर

राफेल विमान आज भारताला मिळणार, राफेलची वैशिष्ट्ये काय?

राफेल हे दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत, ज्यामुळे ते भारताला हवेतून हवेत मारा करण्याची अद्भुत क्षमता देईल.

मुंबई : आज म्हणजे 8 ऑक्टोबरला विजयादशमी आणि वायूसेना दिवसाच्या मुहूर्तावर भारताला पहिलं राफेल विमान मिळणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला पोहोचले आहेत. ते फ्रान्सच्या एअरबेसवरुन राफेल विमानातून उड्डाणही करणार आहेत. मात्र भारताला हे राफेल विमान पुढील वर्षी दिलं जाणार आहे. राफेल हे दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत, ज्यामुळे ते भारताला हवेतून हवेत मारा करण्याची अद्भुत क्षमता देईल. ही दोन्ही क्षेपणास्त्र राफेलचा यूएसपी आहे, असं म्हणता येईल. फ्रान्सला पोहोचल्यानंतर राजनाथ सिंह यांनी आनंद व्यक्त करताना म्हटलं की, "राफेल भारतात येत आहे आणि 8 ऑक्टोबरला ते भारताला सुपूर्द केलं जाईल. यासाठी सगळेच उत्साही आहे, जे स्वाभाविक आहे." एमबीडीएचे भारतातील प्रमुख लुईक पीडेवाशे यांच्या माहितीनुसार, मिटिऑरला व्हिज्युअल रेंज मिसाईल म्हणून जगातील सर्वात मारक समजलं जातं. तर स्काल्पची मारा करण्याची क्षमताही जबरदस्त आहे. फ्रान्स भारताला 36 राफेल विमान देणार आहे. राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये 1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती. 2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे. 3. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं. 4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. 5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे. 6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे. 7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं. 8. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे. भारताला मिळणाऱ्या राफेल विमानात हे सहा बदल होणार! इस्रायली हेल्मेट माऊंटेड डिस्प्ले रडार वॉर्निंग रिसिव्हर्स लो बॅण्ड जॅमर्स 10 तासांची फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग सिस्टम इन्फ्रा-रेड सर्च ट्रॅकिंग सिस्टम राफेल मुद्दा, निवडणूक आणि काँग्रेस 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, राफेल विमानाच्या सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रान उठवलं होतं. राफेल सौद्यात रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवला असा आरोप राहुल गांधींनी केला होता. यावेळी त्यांचं "चौकीदार चोर है" हे वाक्याही गाजलं होतं. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेलं होतं. परंतु राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारला क्लीन चिट दिली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Embed widget