Maharashtra: तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी राज्यस्तरीय कल्याण मंडळाच्या पुर्नगठणास मंजूरी, आता अशासकीय नियुक्या होणार
मध्यंतरी काही कारणास्तव हे खंडित झाले .पुन्हा एकदा या मंडळाची पुनर्स्थापना करावी यासाठी मागणी करण्यात येत होती

Mumbai: राज्यातील तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राज्यस्तरीय तृतीयपंथीय कल्याण मंडळावर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे .गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तृतीयपंथी समुदायाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेले राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ पुनर्गठित करा अशी मागणी राज्यातील सर्व तृतीयपंथींच्या वतीने करण्यात येत होती . त्यावर नियुक्तीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून या महामंडळाच्या सह उपाध्यक्ष सानवी जेठवानी यांनी या निर्णयामुळे 2024 च्या धोरणावर अंमलबजावणी होणार असल्याचे म्हटलं आहे .
नक्की होणार काय?
महाराष्ट्र राज्याचे तृतीयपंथीयांसाठीचे धोरण 11 मार्च 2024 च्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले होते . या धोरणानुसार तृतीयपंथीयांच्या राज्यस्तरीय संरचनेमध्ये बदल करून तृतीयपंथीय कल्याण महामंडळात अशासकीय सदस्यांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात येत होती . या मागणीचे निवेदन पत्र ही काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मंत्र्यांना दिले होते .त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर येत आहे .
तृतीयपंथी समुदायाच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच रोजगार उपलब्धता समाज कल्याण आणि विविध सामाजिक सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने तृतीय पंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती .मध्यंतरी काही कारणास्तव हे खंडित झाले .पुन्हा एकदा या मंडळाची पुनर्स्थापना करावी यासाठी मागणी करण्यात येत होती .दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तृतीयपंथी कल्याण मंडळाची आज स्थापना केल्याचे सानवी जेठवानी यांनी सांगितले .गेल्या अनेक वर्षांची आमची ही मागणी होती .आमचा समाज नेहमीच उपेक्षित राहिला आहे .मात्र आज परिस्थिती बदलत आहे .मुख्यमंत्री यांनी राज्य वेगवान केले आहे .2024 चे धोरण आमच्या समाजासाठी अखेर पर्यंत गेले होते त्याची या बोर्डामुळे अंमलबजावणी होणार असल्याचेही त्या म्हणाल्यात .
हेही वाचा:























