Bajrang Sonwane : संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
Bajrang Sonwane : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एका महिलेचा वापर केला जाणार होता, असा दावा केला जात आहे.

Bajrang Sonwane : कळंब शहरातील एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं पुढे आले होते. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी (Santosh Deshmukh Murder Case) ही महिला संबंधित होती असा दावाही करण्यात आला. या महिलेची ७-८ दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आता या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे. उस्मान सय्यद आणि रामेश्वर भोसले या दोघांना कळंब पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी बीडच्या केजमधील रहिवासी आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असंही काहींचा दावा आहे परंतु पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिला नाही. आता या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी खळबळजनक दावा केलाय.
बजरंग सोनवणे म्हणाले की, माझ्यावरही असा प्रयोग केला होता. मागे एकदा माझा फोटो व्हायरल केला होता. मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात पोलीस स्टेशनला महाजन आणि माळी नावाचे अधिकारी आहेत ते केस घ्यायला तयार नव्हते. माणूस मेल्यानंतर त्यानी केस घेतली. संतोष देशमुख यांचे प्रेत आणताना केजला आणण्याऐवजी कळंबच्या दिशेने नेत होते. तेव्हाच त्यांची योजना होती की, बाईचे प्रकरण दाखवून तिथे मारले गेले असे दाखवाचे. पण मागे गावातील एक गाडी होती. त्यामुळे ते होऊ शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जेलमध्ये झालेल्या प्रकरणावर मला संशय
दरम्यान, बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि बबन गिते गँगचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. काल सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. मात्र नेमकी कुणी कुणाला मारलं याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. कारण महादेव गितेनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. तर दुसरीकडे वाल्मिक कराडनेच मारहाण केल्याचा दावा महादेव गिते केला आहे. याबाबत विचारले असता बजरंग सोनवणे म्हणाले की, जेलमध्ये झालेल्या भांडणाच्या प्रकरणावर मला संशय आहे. एक आरोपी म्हणाला की, मला लातूर ला द्या तर लगेच त्याला लातूरला पाठवलं. टोळीतील प्रमुखाला व्हीआयपी ट्रिटमेंट देण्याच्या दृष्टीने आरोप करायचा आणि मग जे अडसर ठरतात त्यांना बाजूला करायचं. बीड जिल्ह्यातील एकही अधिकारी अजून बदलला नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा























