जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याचा गौळीबार; लष्कर अधिकारी शहीद, 2 नागरिक जखमी
पाकिस्तानी सैनिकांनी बॉम्ब हल्लाही केला. पाकिस्तानी सैन्यांनी डागलेले बॉम्ब रहिवाशी परिसरात कोसळले. या स्फोटामध्ये दोन नागरिक जखमी झाले आहेत.
![जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याचा गौळीबार; लष्कर अधिकारी शहीद, 2 नागरिक जखमी one soldier and 2 civilians killed in pakistan violate ceasefire along loc in uri jammu kashmir जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याचा गौळीबार; लष्कर अधिकारी शहीद, 2 नागरिक जखमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/25211108/ceasefire.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारात भारतीय सेन्याचे एक ज्युनियर कमिशन अधिकारी (जेसीओ) शहीद झाले आहेत. तर दोन नागरिकही जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हाजीपीर परिसरात गोळीबार केला. पाकिस्तानी सैनिकांनी यावेळी बॉम्ब हल्लाही केला. पाकिस्तानी सैन्यांनी डागलेले बॉम्ब रहिवाशी परिसरात कोसळले. या स्फोटामध्ये दोन नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Army sources: One soldier has lost his life in ceasefire violation by Pakistan Army along Line of Control (LoC) in Uri sector. #JammuAndKashmir https://t.co/q7XcdW2TKj
— ANI (@ANI) December 25, 2019
याआधी पाकिस्तानने रविवारी जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. भारतीय सैन्याने त्यावेळीही पाकिस्तानच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. रविवारी पाकिस्तानी सैन्याने मेंढर, कृष्णाघाटी आणि पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतं, याचा नाहक त्रास सीमेवरील नागरिकांना सहन करावा लागतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)