Bangalore Crime: गौरीने चाकू घेऊन मारण्याची दाखवली भीती; संतापलेल्या राकेशने तिच्या हातातील चाकू घेतला अन्... मानेवर, गळ्यावर, पाठीवर केले वार
Bangalore Crime: राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यात गौरीचा मृतदेह ठेवला. बॅगेची चेन लावली व ती बॅग राकेशने घरातील बाथरूमबाहेर नेऊन ठेवली.

Bangalore Crime: घरगुती वादातून पतीनेच पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून केल्याची घटना बंगळुरूत घडली आहे. त्याने खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरातच सुटकेसमध्ये भरून ठेवला. त्यानंतर मुंबईकडे जात असताना त्याने सातारा शिरवळ परिसरात विष प्राशन केले. त्यानंतर तो गाडीतच बेशुध्द झाला, त्यावेळी स्थानिकांनी त्याला उपचारासाठी सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला ही माहिती मिळाली. त्या वेळी बंगळुरूमधील 'मर्डर मिस्ट्री'चा हा भयानक थरार पुढे आला आहे.
राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35, जोगेश्वरी, मुंबई) असे आरोपी पतीचे नाव असून, तर पत्नी गौरी (वय 32) हिचा खून त्याने केला आहे. राकेश याच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाटक पोलिस देखील त्याच्या मागावर होते. तो शिरवळ पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळताच, त्यांनी पुण्याकडे धाव घेतली.
शिरवळ पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश हा फेब्रुवारी महिन्यात पत्नी गौरी हिच्यासह बनारगट्टा तेजस्विनीनगर बंगळुरू येथे नोकरीच्या निमित्ताने गेला होता. तो वर्क फ्रॉम होम करत होता. तर गौरी नोकरीच्या शोधात होती. 26 मार्च रोजी रात्री गौरीने परत मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. त्या कारणातून दोघांमध्ये वाद झाला. गौरी घरातील भांडी आदळू लागली. राकेशने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली. त्याचा राग राकेशला आला. त्याने गौरीच्या हातातील चाकू घेऊन तिच्या मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गौरी घराच्या लॉबीत पडली. तिचा मृत्यू झाल्याचे समजताच राकेश याने घरातील मोठी बॅग रिकामी करून तिचा मृतदेह त्यामध्ये ठेवला. त्यानंतर ती बॅग बाथरूमच्या बाहेर ठेवून दिली.
मुंबईकडे काढला पळ
27 मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास राकेशने कारमधून बंगळुरूमधून मुंबईच्या दिशेने पळ काढला. महाराष्ट्रातील कागल गावी आल्यानंतर त्याने एका मेडिकलच्या दुकानातून फिनाइल आणि झुरळ मारण्याचे औषध विकत घेतले. प्रवासातच त्याने बंगळुरू येथे तो राहत असलेल्या इमारतीतील एका व्यक्तीला गौरीचा खून केल्याची माहिती दिली. तिचा मृतदेह बॅगेत ठेवल्याचे सांगितले. खंडाळा घाट उतरल्यानंतर राकेश याने शिरवळ परिसरात विष (कीटकनाशक) प्राशन करत आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
गौरी अन् राकेशचं शेवटचं भांडण कशावरून?
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35, रा. जोगेश्वरी मुंबई) हा फेब्रुवारी महिन्यात मुंबईहून आपली पत्नी गौरी (वय 32) हिच्यासह बेंगळुरु येथील बनारगट्टा तेजस्विनीनगर येथे राहण्यास आला. राकेश वर्क फ्रॉम होम करत होता, तर त्याची पत्नी गौरी जॉब शोधत होती. 26 मार्च 2025 च्या रात्री राकेशकडे गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. या कारणाने त्यांच्यात वाद झाला. गौरी यावेळी घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा राकेशने आपण राहतो त्या घराचं डिपॉझिट भरलेलं आहे. आपण घर सोडलं, तर डिपॉझिटचे पैसे मिळणार नाहीत, येथे येण्यासाठी खूप खर्च झाला आहे, असं तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण वाद विकोपाला गेला, गौरीने त्याला चाकूने भीती दाखवली. त्यावेळी त्याचा संताप अनावर झाला अन् त्याने तिच्या हातातील चाकू घेऊन तिच्यावरतीच वार केले, यामध्ये तिचा मृत्यू झाला.























