मंत्र्याचा पराभव करत ठरली सर्वात कमी वयाची आमदार, जाणून घ्या कोण आहे नरिंदर कौर
Punjab : मंत्र्याला हरवलं, आता मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता, आपच्या नरिंदर कौरची चर्चा, पंजाबमधील सर्वात कमी वयाची आमदार
![मंत्र्याचा पराभव करत ठरली सर्वात कमी वयाची आमदार, जाणून घ्या कोण आहे नरिंदर कौर narinder kaur bharja became youngest mla of punjab after defeating cabinet minister vijay inder singla मंत्र्याचा पराभव करत ठरली सर्वात कमी वयाची आमदार, जाणून घ्या कोण आहे नरिंदर कौर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/c93458ad36036c185cf4e4cf3c349db9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Narinder Kaur, Youngest MLA of Punjab : पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Punjab Elections) अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (AAP) मोठा विजय मिळवला. आप पक्षाने सत्ताधारी काँग्रेससह भाजप आणि अकाली दल या पक्षाचा सुपडा साफ केला. निवडणुकीत अनेकांना पराभाचा सामना करावा लागला. आप पक्षाची नरिंदर कौर हिने कॅबिनेट मंत्र्याचा पराभव करत इतिहास रचला आहे. नरिंदर कौर पंजाबमधील सर्वात कमी वयाची आमदार झाली आहे.
नुकताच पंजाबमध्ये आमदारांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह 117 आमदारांनी शपथ घेतली. शपथविधीवेळी युवा आमदार नरिंदर कौर भराज (Narinder Kaur Bharaj) यांची खूप चर्चा झाली. पंजाबमधील सर्वात कमी वयाच्या आमदार म्हणून कौर यांची चर्चा रंगली होती. राज्यातही त्या चर्चेचा विषय आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, नरिंदर कौर यांना मंत्रिमंडळात स्थानही मिळण्याची शक्यता आहे. नरिंदर कौर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेता कॅबिनेट मिनिस्टर विजय इंदर सिंग्ला यांचा 36 हजार मतांनी पराभव केला. नरिंदर कौर या अवघ्या 27 व्या वर्षी आमदार झाल्या आहेत. 2014 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार –
भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होणार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता मंत्र्यांना राज्यपाल शपथ देणार आहेत. यामध्ये दहा मंत्र्यांचा समावेश असू शकतो. मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान शनिवारीच पहिली कॅबिनेट बैठक पंजाब सचिवालयात घेणार आहेत.
पंजाबमध्ये 'आप' पर्व सुरू; भगवंत मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री -
पंजाबच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. थोर स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही उपस्थित होते. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर भगवंत मान यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. त्यावेळी ते म्हणाले होते की, ''भगत सिंहजी लढाई लढले, तीच लढाई आम आदमी पक्ष लढत आहे. भगवंत मान म्हणाले की, ''चळवळीतून उदयास आलेला पक्ष देशात परिवर्तन घडवत आहे. पंजाबमधील शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारेल. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबचा विकास करू.''
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)