Manipur: मणिपूरमध्ये विद्यार्थिनींच्या शाळेची बस पलटली, दहा जणांचा मृत्यू तर 40हून अधिक जखमी
Manipur Road Accident: बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही बस पलटली. या ठिकाणी बचाव अभियान सुरू करण्यात आलं आहे.

Manipur Road Accident: मणिपूरच्या नोनी जिल्ह्यामध्ये आज एक अपघाताची घटना घडली. शाळेतील विद्यार्थिंनींना घेऊन जाणारी बस पलटल्याने नऊ विद्यार्थिनींचा आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी इंफाळपासून 55 किमी अंतरावर असलेल्या लोंगराई परिसरातील ओल्ड कछार रोडवर झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह (Manipur CM N.Biren Singh) यांनी मृत विद्यार्थ्यांच्या परिवाराला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
Deeply saddened to hear about the accident of a bus carrying school children at the Old Cachar Road today. SDRF, Medical team and MLAs have rushed to the site to coordinate the rescue operation.
— N.Biren Singh (@NBirenSingh) December 21, 2022
Praying for the safety of everyone in the bus.@PMOIndia pic.twitter.com/whbIsNCSxO
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस पलटली. या घटनेतील जखमी विद्यार्थिनींवर इंफाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह (Manipur CM N.Biren Singh) यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल माध्यमातून लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, "आज ओल्ड कछार रोडवर शाळेची बस पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे मोठं दु:ख झालं. बचाव अभियानासाठी एसडीआरएफ, वैद्यकीय टीम आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळावर पोहोचले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थिनी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी प्रार्थना करतो."
या अपघातामध्ये ज्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी घेतला आहे.
सिन्नर -शिर्डी रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू
दरम्यान, सिन्नर-शिर्डी महामार्गावर मुसळगाव एमआयडीसी शिवारात खाजगी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. अपघातांतर खाजगी बस एमआयडीसी पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेत खाजगी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
